ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 30 - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने चला व्यसनाला बदनाम करूया! या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत लातूर शहरातून व्यसनविरोधी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोपप्रसंगी गांधी चौक येथे दारूच्या बाटलीवर जोड्यांची बरसात करण्यात आली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने व्यसनविरोधी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्याचा प्रारंभ शुक्रवारी काढण्यात आलेल्या व्यसनविरोधी रॅलीने झाला. राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणातून रॅलीचा प्रारंभ झाला़ रॅलीमध्ये तरुणांना गुटखा, दारूच्या दुष्परिणामाची माहिती देऊन व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करण्यात आले. ही रॅली हनुमान चौक, सुभाष चौक, गंजगोलाई मार्गावरून मध्यवर्ती बस स्थानक मार्गे गांधी चौक परिसरात आली. येथे रॅलीचा समारोप झाला. दारूच्या दुष्परिणामामुळे तरुणाई व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे या दारूच्या प्रतीकात्मक बाटलीवर जोड्यांची बरसात करण्यात अाली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे, रामकुमार रायवाडीकर, अॅड. मनोहर गोमारे, अनिल दरेकर, बाबा हालकुडे, रुक्साना मुल्ला, हरिभाऊ जवळगे, दिलीप अरळीकर, वैजनाथ कोरे यांच्यासह महाविद्यालयातील तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
अंनिसने केली दारूच्या बाटलीवर जोड्यांची बरसात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 22:25 IST