शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

‘आनंदवन सर्वात वाईट जागा!’

By admin | Updated: October 19, 2015 02:19 IST

समाजात मानाने जगता यावे, म्हणून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेले आनंदवन हे प्रेमाचे अभयारण्य आहे

मुंबई : समाजात मानाने जगता यावे, म्हणून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेले आनंदवन हे प्रेमाचे अभयारण्य आहे. प्रत्यक्षात ही जगातील सर्वात वाईट जागा असून, कुष्ठरोगाचे निर्मूलन करून ती बंद करणे, हेच आमचे ध्येय असल्याचे उद्गार महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवनाचे सचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले. ते मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना बोलत होते.डॉ. विकास आमटे म्हणाले की, ‘बाबा कुष्ठरोग्यांना समाजात पुन्हा मानाने कसे पाठवता येईल, याचा विचार करायचे. त्यासाठीच बाबा कुष्ठरोग्यांना सामाजिक भूकंप म्हणायचे. समाजाने कुष्ठरोग्यांना पूर्णपणे झिडकारल्याने महारोगी म्हणजे, दलितातील दलित व पीडितातील पीडित माणूस झाला होता. रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र असा कोणताही पुरावा त्यांना मिळत नव्हता. म्हणजेच समाजाप्रमाणेच सरकारनेही त्यांना नाकारल्याची भावना निर्माण झाली होती. म्हणूनच आनंदवन हा एक स्वेच्छा तुरूंग वाटत असून, मी त्याचा जेलर असल्याचे वाटतो.’आनंदवनबद्दल सांगताना आमटे यांनी त्याचा उल्लेख एक प्रयोगशाळा म्हणून केला. १९३७ साली सुरू केलेल्या या प्रयोगापासून आत्तापर्यंत ६५ वर्षांत सुमारे २३ लाख कुष्ठरोगी आणि पीडित लोकांना मदत झाली आहे आणि याच लोकांच्या मदतीतून अंध आणि अपंगांसाठी २८ प्रकल्प आनंदवनने सुरू केले आहेत. मात्र, हे काम करताना सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसताना कर लादले जात असल्याची खंत आमटे यांनी व्यक्त केली.गॅसचे अनुदान बंद केल्याने आनंदवनची आर्थिक गणित बदलल्याचेही त्यांनी सांगितले. आनंदवनात एकच रेशनकार्ड असल्याने हा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, समाजातील अनेक लोकांनी मदत केल्याने निभावल्याचे ते म्हणाले. येथील सर्वात मोठा सार्वजनिक बायोगॅस प्रकल्प सुरू झाल्याने आनंदवन एलपीजी विरहित झाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आयडॉलच्या प्रभारी संचालिका डॉ. अंबुजा साळगांवकर आणि आयडॉलचे एम.ए. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.