शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नित्यनवीन नेपथ्य निर्मितीतच आनंद - बाबा पार्सेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 03:39 IST

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गेली तब्बल पाच दशके त्यांनी नेपथ्य निर्मिती करत रंगभूमीवर अमूल्य योगदान दिलेले आहे. ‘असुनी नाथ मी अनाथ’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘सुरुंग’, ‘मला उत्तर हवंय’, ‘मला काही सांगायचंय’, ‘श्री तशी सौ’अशा अनेक नाटकांपासून अलीकडेच रंगभूमीवर आलेल्या ‘यस माय डिअर’ या नाटकापर्यंत त्यांनी आपल्या नेपथ्याचा ठसा रंगभूमीवर उमटवला आहे. या पुरस्काराचे औचित्य साधत बाबा पार्सेकर यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांनी साधलेला विशेष संवाद...प्रश्न- या पुरस्काराबद्दल तुमच्या काय भावना आहेत?उत्तर - हा पुरस्कार पडद्यामागच्या कलाकाराला दिला गेला, याचा आनंद मोठा आहे. दुसरे म्हणजे, हा पुरस्कार प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने आहे. त्यांचे व माझे खूप जुने संबंध होते. आम्ही दोघेही गोव्याचे! आम्हाला एकमेकांविषयी प्रचंड आदर! त्यामुळे पणशीकरांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला याचे मोठे समाधान मला आहे.गेली पाच दशके तुम्ही नाट्यक्षेत्रात कार्यरत आहात. नेपथ्य निर्मितीच्या दृष्टीने तेव्हाचा आणि आताचा काळ यात विशेष काही फरक जाणवतो का?१९६४मध्ये मी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. आता काळाच्या ओघात या क्षेत्रात फरक झालेला आहेच. नेपथ्याच्या बाबतीत म्हणायचे तर आता सगळेकाही ‘रेडिमेड’ झालेआहे. त्या काळी आमचे पेंटर हाताने रंगवून नेपथ्य उभे करायचे. नाटकात एखादा बगिचा, रस्ता किंवा महाल वगैरे दाखवायचा असेल, तर तो पडद्यावर प्रत्यक्ष रंगवला जायचा. तो तयार झाल्यावर आपण खरेच त्या स्थळी उभे आहोत, असा फील यायचा. आता कॉम्प्युटरवर डिझाईन तयार करतात आणि हवा तो इफेक्ट आणला जातो.मराठी नाटक आजही दिवाणखान्यातून बाहेर पडायला मागत नाही, असा एक आक्षेप नोंदवला जातो, त्याबद्दल तुमचे मत काय?लेखक जेव्हा नाटक लिहितो, तेव्हा अनेकदा तो दिवाणखान्याला गृहीत धरूनच चाललेला दिसतो. पण असे नेपथ्य साकारायचे असले तरी त्यातही काय वेगळेपणा आणता येईल, याचा नीट विचार करतो. संहितेची गरज असेल त्याप्रमाणे विचार करून नेपथ्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. आता लेखकाचे नाटकच जर दिवाणखान्यात घडणारे असेल, तर त्याला काय करणार? पण त्यातही काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करत असतो.आत्तापर्यंत तुम्ही घडवलेल्या नेपथ्यांपैकी तुमचे आवडते नेपथ्य कोणत्या नाटकाचे?मी अनेक नाटकांचे नेपथ्य केले आहे. तरीही एका नाटकाचे केलेले वास्तवदर्शी नेपथ्य माझ्या आजही जसेच्या तसे लक्षात आहे. ‘अमृत मोहिनी’ हे त्या नाटकाचे नाव! त्यात मी कैलास पर्वत उभारला होता. ते माझ्यापुढे आव्हान होते. पण ते नाटक गाजले. सध्या ‘यस माय डिअर’ या नाटकात मी एका कमर्शिअल आर्टिस्टचे घर उभे केले आहे. तेसुद्धा छान जमून आले आहे.तुमच्या नेपथ्य निर्मितीत दिग्दर्शकाचा किती सहभाग किंवा हस्तक्षेप असतो?उत्तर - मी नेपथ्य कागदावर मांडत नाही; मी त्याचे थेट मॉडेलच करतो. हे मॉडेल दिग्दर्शकाच्या समोर ठेवतो. ‘मी हे स्क्रिप्टनुसार केले आहे. यात तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो तुमचा अधिकार आहे,’ असे मी त्यांना सांगतो. कारण दिग्दर्शकाचा मान त्याला द्यायलाच हवा, असे मी मानतो.तुमच्या या यशस्वी कारकिर्दीत काही करायचे राहून गेले आहे असे वाटते का?खरं सांगू का... काही राहिले आहे याचा मी विचार करतच नाही. मला सतत नवनवीन काहीतरी करायचे असते आणि ते माझ्या डोक्यात सुरूच असते. प्रत्येक वर्षी मी नित्यनवीन काहीतरी करतच असतो आणि त्यातच माझा आनंद सामावला आहे.