शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; तेलंगणात भूकंपाचा केंद्रबिंदू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:07 IST

भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या भूकंपाचे पडसाद अनेक ठिकाणी जाणवले.

गडचिरोली - तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपची तीव्रता ५.३ रिक्टर स्केल अशी नोंदविण्यात आलेली आहे. मुलुगु भूकंपाचे केंद्रबिंदू असले तरी महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. त्यामुळे याठिकाणी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

याबाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असं आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या भूकंपाचे पडसाद अनेक ठिकाणी जाणवले. तेलंगणात भूकंपाचे तीव्र धक्के पाहता संबंधित विभाग मदतकार्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा परिसरातील नागरिकांतून होत आहे.

गडचिरोली, अहेरी, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी या  तालुक्यांत घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. घरातील फ्रीज, भांडी तसेच खिडक्यांच्या काचाही हलल्या. नागरिकांनी घराबाहेर पडून एकमेकांना विचारणा केली.  

महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.  प्रशासन परिस्थितीची माहिती घेत आहे. नागरिकांना भूकंपाच्या वेळी सतर्क राहण्याचा आणि गर्दीच्या किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरातून आणि अपार्टमेंटमधून बाहेर पळू लागले. काही वेळ जमीन हादरली, जी त्यांना जाणवली. धक्क्याने खुर्च्यांवर बसलेले अनेक जण खाली पडले.

टॅग्स :Earthquakeभूकंप