शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : वडिलांची हत्या करणा-या मुलाला जन्मठेप, 2016 मधील बेनोडा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 21:47 IST

क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या करणा-या मुलाला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

अमरावती, दि. 23 - क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या करणा-या मुलाला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रवीण ऊर्फ बाल्या रामदासपंत निकम (३७,रा. सांवगा, ता.वरुड) असे आरोपीचे नाव आहे. बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ जुलै २०१६ रोजी ही घटना घडली. सरकारी विधीतज्ज्ञ सुनील देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार  तक्रारकर्ता सुनील ऊर्फ रामदासपंत निकम व त्याची आई सिंधूताई निकम हे २७ जुलै रोजी शेतात पेरणीचे काम करीत होते. आरोपी प्रवीण तेथे आला आणि बैलजोडी घरी असतानाही पुन्हा विकत का घेतली, या कारणावरून त्याने आईशी वाद केला. याच कारणावरून पुन्हा दुपारी प्रवीणने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात सिंधूताई जखमी झाल्या. त्यांनी उपचारासाठी दवाखाना गाठला. याच दरम्यान प्रवीणचे वडिल रामदास दशरथ निकम (५५) हे घरी परतले असता प्रवीणने वडिलांच्या डोक्यावर खलबत्ता मारला. त्यामुळे रामदास निकम हे गंभीर जखमी झाले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी राहुल होले व कमला साबळे होते. रामदास यांना रुग्णालयात दाखल केले असता  त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याघटनेची तक्रार प्रवीणचा भाऊ सुनील निकम याने बेनोडा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (५) व्ही.एस.तिवारी यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता सुनील देशमुख यांनी सहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपी प्रवीण निकमला हत्याप्रकरणात जन्मठेपेची तर भादंविच्या कलम ३२३ अन्वये एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजारांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त शिक्षेचे आदेश दिलेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा