शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील! खडसेंनी फेटाळला आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 16:30 IST

भाजपाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप फेटाळून लावला आहे. अंजली दमानियांबद्दल आपण कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही,

जळगाव, दि. 6 - भाजपाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप फेटाळून लावला आहे. अंजली दमानियांबद्दल आपण कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही,  आपण काहीही बोललो नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दमानिया यांनी खडसे यांच्याविरुध्द बदनामीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

२ सप्टेंबर रोजी खडसे यांचा वाढदिवस साजरा झाला. मुक्ताईनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षा खडसे, राजेंद्र फडके आदींची मुख्य उपस्थिती होती. या जाहीर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना खडसे म्हणाले होते की, माझ्या शेतातील उत्पन्नाबाबत काही वेळेस प्रश्न उपस्थित होतात. परंतु मला सांगायचे आहे की, माझ्या शेतातील आंबे आता मोठे झाले आहेत. कदाचित दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील... 

या वाक्याबाबत अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला असून यावर खडसे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, मी काहीही असभ्य बोललो नाही. अंजली दमानियांचे नावही घेतलेले नाही. दमानिया म्हणजे दुसरी पुरुष व्यक्तीही असू शकते. मात्र अंजली दमानिया यांनी अंगावर घेण्याचे काहीही कारण नाही.खडसे पुढे म्हणाले की, लोकांमध्ये आता असे बोलले जात आहे की, खडसेंचा काहीही विषय असो अंजली दमानिया या नेहमीच त्याचा गाजवाजा करतात. राज्यात अनेक मोठे मोठे विषय गाजले व गाजत आहेत. मात्र त्याबद्दल त्या कधीही बोलत नाही. सुभाष देसाई, प्रकाश मेहता यांच्यासह शालेय पोषण अशी अनेक गंभीर प्रकरणे पुढे आली मात्र याबद्दल अंजली दमानिया काहीही बोलल्या नाही. खडसेंचेच विषय त्या नेहमी पुढे करतात. यामागील कारण काय?

एकनाथ खडसेंचे अंजली दमानियांच्या आरोपांना उत्तर - अजित पवार, सुनिल तटकरे यांच्याविरोधात तक्रारी मागे का घेतल्या ? - एकनाथ खडसेंचा अंजली दमानियांना सवाल. - आरोप करुन माघार घेण्याच कारण काय ? - दाऊदशी माझ्या संबंधांचा आरोप खोटा निघाला- भोसरीची जमीन मी नाही माझ्या जावयाने घेतली.- माझी जमीन 100 टक्के बागायती जमीन. - माझ शेतीशिवाय कशातूनही उत्पन्न नाही. - फक्त मलाच का टार्गेट केले जातेय. - अंजली दमानियांबरोबर माझी भेट झालेली नाही. - विरोधी पक्षात असताना मी त्यांना भेटलो होतो. - कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. - आयुष्यात कधीही महिलेचा अनादर केला नाही. - माझी कोणतीही खासगी कंपनी किंवा संस्था सुद्धा नाही. 

खडसेंना सोडणार नाही - अंजली दमानिया एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल जी भाषा वापरली त्यामुळे मी प्रचंड व्यथित झाले आहे. खडसेंविरोधात मी तिस-यांदा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत आहे. यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, मी थेट कोर्टात जाईन असे दमानिया यांनी म्हटले आहे. आज मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याशीही चर्चा करणार आहे. यावेळी खडसेंना आपण सोडणार नाही असे दमानिया यांनी म्हटले आहे. 

खडसे यांचा राजीनामामागच्यावर्षी एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून, निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर होत आहे, असे खडसे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी लागलीच खडसे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगत त्यांच्यावरील सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे टि्वटरवरुन जाहीर केले होते.  

राजीनाम्याची ७ कारणे...- खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटील याला ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी झालेली अटक.- भोसरी; पुणे येथील एमआयडीसीचा कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड पत्नीच्या नावे खरेदी केला. व्हीसल ब्लोअर हेमंत गवंडे यांनी पुराव्यासह केलेला आरोप आणि पोलिसात दाखल केलेली तक्रार- अंजली दमानिया यांनी कुऱ्हा-बडोदा उपसा सिंचन योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी आज़ाद मैदानावर आरंभिलेले उपोषण- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून खडसेंच्या मोबाइलवर झालेले कथित कॉल्सचे प्रकरण हॅकर मनिष भंगाळे याने बाहेर काढले.- खडसे यांच्या कार्यालयातील वादग्रस्त अधिकारी वर्ग - मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अधूनमधून उडणारे खटके - पत्नीला महानंदचे संचालकपद, मुलीकडे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि सूनबाई खासदार. पक्षश्रेष्ठींना ही घराणेशाही खटकली.