शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाकांक्षी व्हर्च्युअल क्लासरूमचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: December 22, 2016 22:36 IST

महत्वाकांक्षी व्हर्च्यूअल क्लासरूम उपक्रमाचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. २२ - विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी व्हर्च्यूअल क्लासरूम उपक्रमाचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, उपमहापौर राजेद्र साप्ते, सभागृह नेत्या अ‍ॅड. सौ. अनिता गौरी, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, स्थानिक नगरसेवक विलास सामंत, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व नगरसेवक नरेश म्हस्के, नगरसेवक हिराकांत फर्डे, विकास रेपाळे, रिलायन्सचे संचालक सुब्रतो रथो, अतिरिक्त आयुक्त(२) अशोककुमार रणखांब, एसआरडी सोल्यूशनच्या डॉ. सोनाली लोहार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाच्या माझ्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच, करीअर मार्गदर्शन आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायला हवे याचेही मार्गदर्शन करायला हवे असे सांगितले. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात नवी पहाट झाल्याचे सांगितले.या उपक्रमातंर्गत ठाणे महानगरपालिकेच्या १९ क्रमांक शाळेच्या पहिल्या मजल्यावर दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. या स्टुडिओमधून प्रसारित करण्यात येणारी शैक्षणिक व्याख्याने महापालिकेच्या १० मराठी आणि ३ उर्दू शाळांमधील १० वीच्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी एेकता येणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व व्याख्याने संवादात्मक असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मनात असलेल्या प्रश्नांची उत्तर् त्यांना त्याचवेळी मिळू शकणार आहेत. अशा पद्धतीचा उपक्रम राबविणारी ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसरी महापालिका आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे व्हर्च्यूअल क्लासरूम उभारण्यात आले असून एसआरडी सोल्यूशन्स या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या व्हर्च्यूअल क्लास रूमसाठी महापालिेकेच्या शाळांमधील शिक्षकांनाही व्हर्च्यूअल स्टुडिओमध्ये कसे बोलावे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमाचा फायदा महापालिका शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांनी फायदा होणार असून पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या १३ मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता १० वीच्या एकूण १३५८ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

(छायाचित्र- विशाल हळदे)