शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

अमिताभ-रजनीकांत भेटीने रसिक भारावले..!

By admin | Updated: November 21, 2014 01:00 IST

‘बॉस’चा ‘बिग ब्रदर’ला वाकून नमस्कार

संदीप आडनाईक-- पणजी : महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत या चित्रपट क्षेत्रातील दोन दिग्गज कलाकारांची भेट गुरुवारी गोव्यात ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली. सर्वप्रथम महानायक अमिताभ बच्चन यांनी महोत्सवात प्रवेश केला आणि सभागृहातील उपस्थित चाहत्यांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर थोड्याच वेळात दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचे आगमन होताच त्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.रजनीकांत यांनी थेट अमिताभ यांच्याकडे जात त्यांना वाकून नमस्कार केला आणि अमिताभ यांनी मिठी मारत रजनीकांत यांचे स्वागत केले. दोघांनीही काही काळ संवाद साधला आणि ‘जॉन जॉनी जनार्दन’, ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’ आणि ‘हम’ यासारख्या चित्रपटांतील भूमिकेच्या आठवणींना उजाळा दिला.अमिताभ आणि रजनीकांत यांची पुन्हा भेट झाली ती रजनीकांत यांना पुरस्कार देतेवेळी व्यासपीठावर. पुरस्कारापूर्वी आपल्यावरील जीवनपट पाहून रजनीकांत यांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या. अभिनेत्री रविना टंडन यांनी रजनीकांत यांना चार शब्द सांगण्याची विनंती करताच त्यांनी मी इथे पुरस्कार स्वीकारायला आलो होतो. भाषण देण्याची तयारी नाही, असे सांगत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना खूपच आनंद होत आहे, असे सांगितले. अमिताभ यांच्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांचा ‘बिग ब्रदर’ असा उल्लेख केला. अमिताभ यांनीही काहीही न बोलता दोघांमधले मैत्रीचे नाते अधिक दृढ केले. अमिताभ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, मानपत्र, तर अरुण जेटली यांच्या हस्ते शताब्दी पुरस्काराचा दहा लाख रुपयांचा धनादेश रजनीकांत यांना सुपूर्द करण्यात आला.