शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘हम दो, हमारे दो’साठी घटनादुरुस्ती विधेयक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 05:00 IST

शिवसेना खासदार अनिल देसाईंचा पुढाकार; लोकसंख्येमुळे आर्थिक विकासाला मर्यादा

नवी दिल्ली: देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी फक्त दोनपर्यंतच अपत्ये जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना करांमध्ये सवलत तसेच शिक्षण व नोकरीत प्राधान्य देऊन प्रोत्साहित करण्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत एक खासगी घटनादुरुस्ती विधेयक सादर केले आहे.

अशी खासगी विधेयके मंजूर होत नाहीत. मात्र त्या अनुषंगाने त्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन फार तर सरकार त्या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देते. घटनादुरुस्तीसाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक असल्याने खास करून असे खासगी विधेयक मंजूर होणे अशक्यप्रायच असते.अनिल देसाई यांनी राज्यघटनेत दुरुस्ती करून ४७ ए हा नवा अनुच्छेद समाविष्ट करण्यासाठी ही विधेयक मांडले आहे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सरकारने लहान कुटुंबाला प्रोत्साहन द्यावे व त्यासाठी अपत्यांची संख्या दोनपर्यंत मर्यादित ठेवणाऱ्यांना करात सवलत आणि नोकरी, शिक्षण व सामाजिक लाभांमध्ये प्राधान्य द्यावे तसेच याचे पालन न करणाºयांना या लाभांपासून वंचित करावे, असे त्यात म्हटले आहे.हे विधेयक मांडण्यामागची भूमिका स्पष्ट करताना खासदार देसाई म्हणतात की, मोठ्या लोकसंख्येने देशाच्या आर्थिक विकासावर मर्यादा येतात. नैसर्गिक साधनांवर ताण पडून पर्यावरणाचे संतुलनही बिघडते. गेल्या ४० वर्षांत भारताची लोकसंख्या दुपटीने वाढून १२५ कोटींच्या पार गेली आहे. सन २०५०पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकसंख्या आटोक्यात ठेवणे नितांत गरजेचे आहे.

मार्गदर्शक तत्वे लक्षात घ्यावीखासदार देसाई यांनी ज्या अनुच्छेद ४७ मध्ये दुरुस्ती सुचविली आहे तो राज्यघटनेच्या चौथ्या खंडात आहे. या खंडात ३६ ते ५१ असे एकूण १६ अनुच्छेद आहेत व त्यांना ‘राज्यव्यवहाराची मार्गदर्शक तत्वे’ असे म्हटले जाते. यात दिलेले विषय हे नागरिकांचे मूलभूत हक्क नाही व त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही. मात्र सरकारने कायदे करताना ही मार्गदर्शक तत्वे लक्षात घ्यावी, अशी अपेक्षा आहे. समान नागरी कायदा हा विषय यातच आहे. पण सरकारने त्यासाठी अद्याप काही केलेले नाही. मात्र शिक्षणहक्क कायदा यानुसारच केला गेला आहे. त्यामुळे हे विधयक मंजूर होऊन घटनादुरुस्ती झाली तरी ‘हम दो, हमारे दो’साठी सरकारने प्रोत्साहन योजना राबवावीच, अशी सक्ती मात्र केली जाऊ शकणार नाही.

टॅग्स :lok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना