शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मेडिकलमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा

By admin | Updated: October 27, 2014 00:31 IST

‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र अनेक चालकांनी त्याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआमपणे लूट चालविली आहे. यामुळे गरीब

नागपूर : ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र अनेक चालकांनी त्याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआमपणे लूट चालविली आहे. यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना गंभीर रुग्ण इस्पितळात घेऊन जाण्यासाठी किंवा मृतदेह रुग्णालयातून घरी नेणे जिकरीचे झाले आहे. दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून या चालकांना रोखणारे कुणीच नाही, यामुळे त्यांनी रुग्णांची पळवापळव करणे पुन्हा सुरू केले आहे. सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला अ‍ॅम्ब्युलन्सचा धंदा नागपुरात इतर व्यवसायाप्रमाणेच बहरला आहे. अमर्याद कमाईमुळे अनेकजण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. सर्वसाधाण चालकापासून भंगारवाल्यांपर्यंत, तसेच विविध पक्ष, संघटनांचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असणाऱ्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. खासगी अ‍ॅम्ब्युलन्सचा मोठा तळ मेडिकल, मेयो आणि डागा रुग्णालयाच्या परिसरात आहे. या अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर या रुग्णालय प्रशासनाने मेहेरनजर दाखविल्याचे दिसून येत आहे.रुग्ण पळवून नेण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सची मदतदरम्यानच्या काळात मेडिकलमधून रुग्णांना पळवून नेणाऱ्यांवर वचक बसला होता. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी स्वत: यात पुढाकार घेऊन अशा अनेक दलालांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. परंतु आता याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा कमिशनच्या लोभापोटी मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांना भीती दाखवून विशिष्ट खासगी इस्पितळात पळवून नेले जात आहे. यात संबंधित एजंट अ‍ॅम्बुलन्स चालकाच्या मदतीने हे काम तडीस नेत आहेत. गंभीर रुग्णांकडेही असते त्यांचे लक्षकुठल्या वॉर्डात किती रुग्ण गंभीर आहेत, व्हँटिलेटरवर किती आहेत, बर्निंग वॉर्डात उपचार घेत असलेल्या व शंभर टक्के जळालेल्या रुग्णाची तब्येत कशी आहे, याची माहिती अ‍ॅम्बुलन्स चालक व त्यांचे एजंट वॉर्डावॉर्डात फिरून घेतात. रुग्णाचे निधन झाल्यावर आपल्यालाच धंदा मिळावा, यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाशी जवळीक साधण्याचे ते प्रयत्न करतात. रुग्णाचा मृत्यू होताच माफक दरात गावाला घेऊन जाण्याच्या नावाखाली काही चालक मनमानीपणे पैशाची वसुली करतात. दरफलक नसल्यामुळे मनमानीएखादा अ‍ॅम्ब्युलन्स चालक ५० कि.मी.अंतरावरील गावात जाण्यासाठी दोन हजार रुपये घेत असेल तर दुसरा १२०० रुपयांत तयार होतो. यावरून अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचे दर निश्चित नसतात. अ‍ॅम्ब्युलन्ससाठीचे दरफलक पार्किंगच्या ठिकाणी लावल्यास मृताच्या नातेवाईकांची लूट होण्याचे प्रमाण कमी होईल. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डिझेल भरून येतो असे सांगून मृताच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन पसार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अ‍ॅम्ब्युलन्सची उपयुक्तताआरोग्य सेवेत अ‍ॅम्ब्युलन्सला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्यसरकारने अ‍ॅम्ब्युलन्सला रोड टॅक्समधून सवलत दिली आहे. रुग्णाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहचता यावे यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सला सायरन वाजविण्याची मुभाही देण्यात आली आहे. अ‍ॅम्ब्युलन्सवर निळ्या रंगाचा दिवा असतो. वाहतुकीच्या सिग्नलवर त्यांना थांबण्याची सक्ती नसते. कुठल्याही प्रकारचा टोल त्यांना लागू नसतो. अशा अनेक सोयी त्यांना दिल्या जातात, मात्र याचा गैरफायदाच घेत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)