शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अमृततुल्य

By admin | Updated: April 30, 2017 02:43 IST

कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.

- भक्ती सोमण कोणत्याही हंगामात सहज पिता येतील, अशी पेये म्हणजे पीयूष आणि लस्सी. पेयसंस्कृतीत या दोन्ही पेयांना विशेष महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, ही पेये या काळात वरदान ठरतील.उन्हाळ्यात हैराण झालेल्या देहाला पौष्टिक प्यायला मिळाले, तर सोनेपे सुहागाच. खरे तर उन्हाळा सुसह्य होईल, अशी एकसोएक पेये या काळात मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून तर या पेयांचे आपले असे वैशिष्ट्य आहे. पीयूषबाबत बोलायचे झाल्यास, कोणत्याही हंगामात पिता येणारे हे पेय आहे. काही पेये पिऊन जिवाला समाधान मिळते, तसेच दह्यापासून तयार केलेले हे पीयूष पिताना मिळते. दही, साखर, जायफळ किंवा वेलची आणि थोडंसे पाणी. हे तर घरात अगदी सहज उपलब्ध असते. बस याच चार गोष्टी एकमेकांत मिसळायच्या, झाले पीयूष तयार. ते पिताना दह्याच्या गोडव्याबरोबर जायफळाचा गंधही रोमारोमांत भिनतो. मात्र, ती तार जमण्यासाठी पीयूष तयार करण्याचे नेमके तंत्र जमावेच लागते. ते जमले की चव बदलणार नाही, ही खात्रीच. अशा या चविष्ट पीयूषविषयी अनेकांच्या मनात खास स्थान आहे. आजही गिरगावात गेले की, आम्ही मैत्रिणी हट्टाने पीयूष पितो. अमेरिकेत असलेल्या मैत्रिणीही आमच्यापेक्षा पीयूषचीच जास्त आठवण काढतात. विविध पेयांच्या भाऊगर्दीत आजही पीयूषविषयी वाटणारे ममत्व जरा जास्त आहे. आणि हे स्थान निर्माण करण्यात ‘प्रकाश’च्या पीयूषचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. किंबहुना, पीयूष म्हटले की, प्रकाश आणि प्रकाश म्हटले की पीयूषच डोळ्यांसमोर येते. गिरगाव आणि दादर या दोन्ही ठिकाणी असलेल्या प्रकाशच्या पीयूषच्या चवीत १९४६पासून यत्किंचितही बदल झालेला नाही. सध्या प्रकाशची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. पीयूषच्या चवीविषयी दादरच्या प्रकाश उपाहारगृहाचे मालक आशुतोष जोगळेकर म्हणाले, आमच्याकडे रोजच ताज्या दह्यापासून पीयूष तयार होते. त्यामुळे ते पिताना ताजेपणा मिळतो. गेली कित्येक वर्षं हा शिरस्ता पाळला जात असल्याचे जोगळेकर म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पीयूष लवकर संपवावे लागते. कारण ४-५ दिवस झाले, तर त्या पीयूषला आंबूूस वास यायला सुरुवात होऊन चवच बदलते. म्हणून ताजे पीयूषच नेहमी आपलेसे वाटते.आजकाल कोणत्याही पेयात काही ना काही टिष्ट्वस्ट करून ते पेश करण्याची पद्धत सुरू आहे. मात्र, पीयूषमध्ये असे काही बदल केल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही. त्यामुळे पीयूषचे स्थान हे विशेषच आहे, यात शंकाच नाही.पंजाबदी लस्सीउन्हाळ्याच्या दिवसांत गारेगार लस्सी मनाला थंडावा देते. मलईयुक्त दह्यास घुसळून त्यात साखर घालून लस्सी करतात. दही आपण नेहमीच खातो, पण लस्सी करून प्यायल्याने त्यातील पोषक तत्त्वे अधिक प्रमाणात शरीराला मिळतात. पंजाब प्रांतात तर लस्सी रोज प्यायली जाते. किंबहुना, लस्सी म्हटले की, पंजाबच डोळ्यांसमोर येतो. मातीच्या छोट्या मडक्यात ताजे घट्ट दही, साखर आणि क्रीम एकत्र करून लस्सी पिण्यात खरी मजा आहे. या गोड लस्सीचे सध्या विविध प्रकार मिळत आहेत. दह्यात पुदिना, धने-जिरे पावडर एकत्र करून मिठी लस्सी केली जाते. याशिवाय दह्यात आंब्याचा रस, पिस्ता फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर असेही प्रकार लोकप्रिय आहेत. या लस्सीला ताकाप्रमाणेच स्मोकी फ्लेवर देता येऊ शकतो. अशी स्मोकी लस्सी एकदा तरी करून बघाच!