शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

असा आहे आंबेडकर भवनाचा वाद

By admin | Updated: April 18, 2017 05:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे केंद्र असलेली दादर येथील इमारत मोडकळीस आल्याने सदर आंबेडकर भवन आणि त्यालगतची प्रिंटींग प्रेस

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे केंद्र असलेली दादर येथील इमारत मोडकळीस आल्याने सदर आंबेडकर भवन आणि त्यालगतची प्रिंटींग प्रेस २५ जून २०१६ च्या रात्री जमीनदोस्त करण्यात आली. एका रात्रीतून अचानक आंबेडकर भवन पाडण्यात आल्याने समाजात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. आंबेडकर भवनाच्या मालकीवरुन ‘दी पीपल्स् इम्प्रव्हमेंट ट्रस्ट’चे विश्वस्त आणि बाबासाहेबांच्या नातंवंडामध्ये संघर्ष सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘दी बॉम्बे शेड्युल्ड कास्ट इम्प्रव्हमेंट ट्रस्ट’ची स्थापना केली. १९४४ जनसहभागातून जमा झालेल्या निधीतून या ट्रस्टच्या माध्यमातून दादर येथे सामाजिक केंद्रासाठी भूखंड घेतले. सध्या आंबेडकर भवन म्हणून ओळखली जाणारी दादरमधील ही वास्तू पुढे डॉ. बाबासाहेबांच्या सर्व लढ्याचे केंद्रबिंदूच ठरली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही ‘आंबेडकर भवन’ ही वास्तू दलित चळवळीचे केंद्र ठरले. पुढे या वास्तूची मालकीवरुन ट्रस्ट आणि आंबेडकरांच्या वारसदारांमध्ये खटके उडत राहीले. दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळातील ही वास्तू धोकादायक ठरल्याने मुंबई महापालिकेने १ जून २०१६ रोजी आंबेडकर भवनला नोटीस बजावली. या नोटीसीच्या आधारे ट्रस्टने २५ जून रोजी एका रात्रीतून आंबेडकर भवन आणि लगतच्या प्रिटींग प्रेसची इमारत जमीनदोस्त केली. ट्रस्टने तडकाफडकी केलेल्या या कामामुळे मोठा वाद पेटला. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचा ट्रस्ट आणि प्रकाश व आनंदराज या आंबेडकरांच्या नातवंडामध्ये संघर्ष उभा राहीला. तर, बाबासाहेबांशी संबंधित पुरातन वास्तू तडकाफडकी पाडण्यात आल्यामुळे दलित समाजातही तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली. सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंबेडकर भवन पाडण्यात राज्य सरकारची कोणतीच भूमिका नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पाडकाम करणा-यांच्या चौकशीचे आदेश दिले.