शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईचे सरकारी पुजारी उंबऱ्याबाहेरच

By admin | Updated: June 24, 2017 04:13 IST

करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिराचे सगळे व्यवस्थापन देवस्थान समितीतर्फे केले जात असताना, समितीचे सरकारी पुजारी मात्र देवीच्या उंबऱ्याबाहेरच आहेत

इंदुमती गणेशलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिराचे सगळे व्यवस्थापन देवस्थान समितीतर्फे केले जात असताना, समितीचे सरकारी पुजारी मात्र देवीच्या उंबऱ्याबाहेरच आहेत. या पुजाऱ्यांना देवीच्या मूर्तीजवळ जाण्याचा किंवा पूजेचा अधिकार नाही. केवळ समितीकडे पावतीने आलेले अभिषेक करून देणे आणि आलेल्या भक्तांना उंबऱ्यापासून देवीचे दर्शन घडविणे एवढ्यापुरतचे या पुजाऱ्यांचे अधिकार मर्यादित आहेत. सध्या असे चार निमसरकारी पुजारी देवीच्या सेवेत आहेत.अंबाबाईच्या गाभाऱ्यातील हक्कदार पुजारी केवळ देवीचे धार्मिक विधी करतात आणि त्यांच्या वारात देवीला नेसविल्या जाणाऱ्या साड्या किंवा अन्य पूजेच्या साहित्याची जोडणी करतात. अलीकडे मूर्ती संवर्धनासाठी म्हणून केवळ एका पुजाऱ्याने पुढाकार घेतला होता. बाकी श्रीअंबाबाई मंदिराच्या परिसराचा, स्वच्छतेचा, व्यवस्थापनाचा, सुरक्षेचा सगळा खर्च देवस्थान समिती करते. देवीच्या नैवेद्याचा मानही एका कुटुंबाला असून, त्याचीही व्यवस्था समितीतर्फेच केली जाते. शासनाच्या वतीनेही सरकारी पुजारी नेमणे गरजेचे असल्याने, देवस्थान समितीचे अध्यक्ष अ‍ॅड अशोकराव साळोखे यांच्या काळात म्हणजे १९८० च्या दरम्यान चार सरकारी पुजारी नेमण्यात आले. हे पुजारी म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बिंदू चौकातील श्री शाहू वैदिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांना दरमहा १७ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. आता ज्यांच्याकडे देवीच्या पूजेचा अधिकार आहे, अशी पुजाऱ्यांची ५० कुटुंबे आहेत. त्यातील मूळ पुजारी म्हणून मुनीश्वर यांना मानले जाते व नंतर वहिवाटीने ही संख्या वाढत गेली.सध्या समितीच्या वतीने सरकारी पुजारी म्हणून योगेश व्यवहारे, मारुती भोरे, आदिनाथ सांगळे व सुदाम सांगळे हे काम करीत आहेत. त्यातील मारुती भोरे व सुदाम सांगळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. हे काही कारणाने गाभाऱ्यात गेले, तर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्याने दिली. ‘गाभारा आमच्या मालकीचा,’ असे सांगत गाभाऱ्यातील पुजाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावू दिले नाहीत, ए. सी. बसवू दिला नाही. आम्ही काही करायला गेलो की, ते न्यायालयात जायचे. गाभाऱ्यातून गुटख्याच्या पुड्या, बिडीची थोटके अनेक वेळा सापडली आहेत. पावित्र्याचे भान फक्त भक्तांनीच राखायचे का...? - अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, माजी अध्यक्ष, देवस्थान समिती