अलिबाग : अलिबाग येथील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांना किरिगस्तानमधील ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक कामगिरी पाहून किरिगस्तानमधील ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या पुरस्कारासाठी अमर वार्डे यांची निवड करण्यात आली होती. २१ मे रोजी किरिगस्तानमधील बिशकेक येथे झालेल्या इंटरनॅशनल अचिव्हर्स समिटमध्ये किरिगस्तानमधील भारताचे राजदूत जयंत खोब्रागडे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. काही अपरिहार्य कारणांमुळे वार्डे या पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहू शकले नव्हते. ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनने वार्डे यांना पुरस्कार, सन्मानपत्र व सुवर्णपदक येथे पोहोच केले. त्यांना यापूर्वी इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिल व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन अॅण्ड मॅनेजमेंट या संस्थेने ज्वेल्स आॅफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. (प्रतिनिधी)ज्वेल्स आॅफ इंडिया पुरस्कार काही अपरिहार्य कारणांमुळे वार्डे या पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहू शकले नव्हते. ग्लोबल अचिव्हर्स फाऊंडेशनने वार्डे यांना पुरस्कार, सन्मानपत्र व सुवर्णपदक येथे पोहोच केले. त्यांना यापूर्वी इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिल व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन अॅण्ड मॅनेजमेंट या संस्थेने ज्वेल्स आॅफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.
अमर वार्डे यांना इंटरनॅशनल पुरस्कार
By admin | Updated: June 9, 2016 03:33 IST