शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातास परवानगी द्या!

By admin | Updated: June 9, 2017 05:31 IST

शेजारच्याने मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेजारच्याने मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आठ महिने कोंडून ठेवले. पोलीस तपासास विलंब झाल्याने मुलगी गर्भवती राहिली. मात्र तोपर्यंत तिच्या गर्भारपणाला २६ आठवडे उलटून गेले होते. ससून रुग्णालयाने गर्भपातास नकार दिला. मुलीच्या जीवन जगण्याच्या अधिकारावर गदा आणली जात आहे, अशी व्यथा एका १७ वर्षीय मुलीच्या वडिलांनी याचिकेत मांडली. मुलगी मानसिकरीत्या उद्ध्वस्त झाली असून नकोसे गर्भारपण शारीरिक रीत्याही सहन करू शकत नाही. त्यामुळे तिला गर्र्भपाताची परवानगी द्यावी, अशी विनंती वडिलांनी याचिकेत केली. पुण्यात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी या घटनेस दत्तवाडी पोलिसांनाही जबाबदार धरले आहे. पोलिसांनी वेळेवर तपास केला असता तर मुलीचा योग्य वेळी गर्भपात करता आला असता किंवा ही परिस्थिती ओढावलीच नसती. त्यामुळे मुलीच्या उपचारासाठी व तिच्या भविष्यासाठी दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंती वडिलांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १२ जून रोजी ठेवली आहे.याचिकेनुसार, २२ आॅगस्ट २०१६ रोजी कामावरून मुलगी न परतल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. दरम्यान शेजारचा मुलगा प्रशांत सर्वदेही गायब असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. अखेर २३ एप्रिल २०१७ रोजी पोलिसांनी या दोघांना सोलापूरमधून ताब्यात घेतले.मुलीच्या जबानीनुसार २२ अ‍ॅगस्टला प्रशांत कॉलेजमध्ये आला. वडिलांनी तत्काळ बोलावल्याचे सांगितले. शेजारीच राहणारा मुलगा असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. मुलगा तिला हडपसरला घेऊन गेला. त्यानंतर सोलापूरला घेऊन गेला. त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास मुलीवर जबरदस्ती केली होती.>लादलेले गर्भारपण‘मी माहिती दिल्यामुळे पोलीस या दोघांना शोधू शकले. नातेवाईक आणि मित्र यांच्या मदतीने मुलीचा पत्ता शोधू शकलो. तिच्यावर जबरदस्तीने हे गर्भारपण लादण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही महिलांचा अधिकार लक्षात घेत बलात्कार पीडितांना २० आठवडे उलटल्यानंतरही गर्भपात करण्याची मुभा दिली आहे. माझ्या मुलीचा सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ठीक नाही, असे तिच्या वडिलांनी सांगितले.