शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सेनेत फूट पडण्याआधीच आमदार निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 06:12 IST

राज्य सरकारचा प्रतिज्ञापत्राद्वारे दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारने पक्षपातीपणा करत स्वत:च्याच पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी ‘महाराष्ट्र स्थानिक विकास निधी’चे वाटप केल्याचा आमदार रवींद्र वायकरांचा आरोप राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे फेटाळला आहे. वायकर न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. शिवसेनेत फूट पडण्याआधीच निधीचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेत असलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठीही निधी देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी  वायकरांनी आक्षेप घेतला नाही, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

नगरविकास विभाग व जिल्हा नियोजन समितीने वायकर यांनी केलेले सर्व दावे प्रतिज्ञापत्राद्वारे फेटाळत त्यांच्या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र स्थानिक विकास निधी व जिल्हा वार्षिक योजना निधी एकच असल्याचे समजून चूक केली आहे. स्थानिक विकास निधीचे वाटप आणि वितरण सर्व आमदारांमध्ये समप्रमाणात करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक निधीचे वितरण व वाटप जिल्हा नियोजन समिती करते. निधीचे वाटप मतदारसंघानुसार न होता योजनांनुसार केले जाते. राज्य आपत्कालीन विभागाने लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार ७०० योजनांसाठी निधी वितरीत करण्याची सूचना केली होती. त्यांच्या शिफारशी विचारात घेऊन २०२२ मध्ये निधीचे वाटप करण्यात आले, असे जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यांनी सादर  केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

‘वार्षिक जिल्हा योजना’ संपूर्ण विकासाच्या आवश्यकतेच्या आधारे तयार  करण्यात येते. मुंबईच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे उपनगरी भाग हा १०० टक्के शहरी जिल्हा आहे. जिल्हा आराखडा मतदारसंघनिहाय  तयार केलेला नाही. सरकारचे तसे निर्देशही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे निधी वाटपात पक्षपात किंवा भेदभाव केल्याचा आरोप नाकारण्यात येत आहे, असे जिल्हा नियोजन समितीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

जिल्हा नियोजन समितीचे म्हणणे काय?

- ठराविक राजकीय पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघासाठीच निधीचे वितरण आणि वाटप करण्यात आले आहे, या चुकीच्या धारणेवर याचिका दाखल करण्यात आल्याचा दावाही समितीने केला आहे.- तसेच वायकर यांनी सरकारने पक्षपातीपणा केल्याचा आरोप फेटाळताना नियोजन समितीने म्हटले आहे की, याचिकादारांनी बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांना किती निधी मिळाला आहे, हे याचिकेत नमूद केले आहे. मात्र, निधी वाटप केल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेत फूट पडली. त्यावेळी निधी वाटप करताना वायकर यांनी आक्षेप घेतला नाही.- वायकर यांनी केलेली याचिका दंड आकारून फेटाळावी, अशी विनंती नगरविकास विभागाने न्यायालयाला केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGovernmentसरकारRavindra Vaikarरवींद्र वायकर