शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

विधानसभा निवडणुकीतही राहणार युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 03:44 IST

मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही

मुंबई : ‘आमची युती विधानसभा निवडणुकीपर्यंतच नाही तर त्या पुढील निवडणुकांतही कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांचे अभिनंदन केले. यावेळी मातोश्रीबाहेर प्रचंड विजयी जल्लोष सुरू होता.

जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि युतीच्या ऐक्याचा विजय आहे. जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मातोश्रीवर आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतल्यासारखे वाटत आहे. आज गोपीनाथ मुंडेंचीही आठवण होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्याकाळात काही चुका घडल्या, युतीतील संबंध काहीवेळा ताणले गेले, जे घडले ते दुर्दैवी होते पण त्यातून आम्ही आता शिकलो आहोत. यानंतरच्या सर्व निवडणुकांना आम्ही एकदिलाने सामोरे जावू.

विरोधी पक्षांनी मोदी व भाजपची निंदा करण्यातच वेळ घालवला. आम्ही विकासाचा, समस्यांवर मात करण्याचा अजेंडा त्यांना दिला. मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला. आता विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. २ दिवस जल्लोष करु पण राज्यासमोरील दुष्काळाचा सामना करण्याचे आव्हान मोठे आहे, त्यावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.ते माझे मोठे भाऊ, त्यांचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी युतीमध्ये आता मोठा भाऊ कोण या पत्रकारांच्या प्रश्नात, ‘तुम्ही त्यात पडू नका, आमचे आम्ही पाहू’असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. हजरजबाबी मुख्यमंत्री लगेच म्हणाले, उद्धवजी माझे मोठे भाऊ आहेत आणि मोदीजी त्यांचे मोठे भाऊ आहेत’. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी खास कविता सादर केली.

आधी पक्ष कार्यालय मग मातोश्रीराजकीय कारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासून ज्या पक्षाची अत्यंत निष्ठेने सेवा केली त्या भाजपच्या विजयाने अत्यंत उत्साहित झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरून निघून पहिले गाठले ते भाजपचे कार्यालय. तेथील विजयाच्या जल्लोषात ते सहभागी झाले. तेथून ते उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांचे तंतोतंत भाकीतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना लोकसभा निवडणुकीसंदर्भात जे जे भाकित व्यक्त केले ते ते तंतोतंत खरे ठरले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती ४० हून अधिक जागा जिंकेलच, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी तब्बल ७५ हून अधिक सभा घेत राज्य ढवळून काढले होते. प्रचाराचे प्रभावी नियोजन केले. लोकमतशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशात ५५ हून अधिक, पश्चिम बंगालमध्ये १५ हून अधिक, बिहारमध्ये ३५ हून अधिक तर राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एखाददोन अपवाद वगळता सर्व जागा भाजप/एनडीए जिंकेल असे ठामपणे सांगितले होते. तेही शंभर टक्के खरे ठरले आहे.

लावा रे ते फटाके...मुंबईसह महाराष्ट्रात मराठी मते फोडण्याचा प्रयत्न झाला याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, मला त्यावर काही बोलायचे नाही. आजचा दिवस विरोधकांवर बोलण्याचा नाही. मी फक्त एवढेच म्हणेन, ‘लावा रे ते फटाके’. राज ठाकरे यांच्या ‘लावा रे तो व्हीडीओ’ची त्यांनी अशी खिल्ली उडविली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस