शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

युतीत शिवसेनेला हवंय प्रत्येक जिल्ह्यात स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 14:26 IST

शिवसेनेचे धोरण राज्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यावर असून त्या दृष्टीने प्रशांत किशोर यांच्या सल्लानुसार नियोजन करण्यात येत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युतीला राज्यातही विधानसभेसाठी चांगले वातावरण असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, विधानसभेला आम्हालाच अधिक पसंती असल्याचे भाजपकडून सतत सांगण्यात येत आहे. यावर शिवसेनेसाठी देखील राज्यात चांगले वातावरण असून प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला स्थान हवय अशी मागणी शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्याचे समजते.

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे सतत युती होणारच असा पुनरोच्चार करत आहेत. परंतु, जागा वाटपावरून  अद्याप एकमत झाले नाही. शिवसेनेकडून पक्ष विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यात वावग काय, असा सवालही शिवसेनेकडून भाजपला विचारण्यात येत आहे. त्यातच भाजपने जिंकलेल्या काही जागाही शिवसेनेला हव्या आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.दरम्यान शिवसेनेचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी भाजपप्रमाणेच शिवसेनेला देखील राज्यात चांगले वातावरण असल्याचे सांगितले. त्याचवेळी शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळावे, असही त्यांनी शिवसेना प्रमुखांकडे सुचवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला लाभलेल्या प्रतिसादाच्या खालोखाल आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गर्दी जमल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप मजबूत आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचा एकही आमदार नाही. बीडमध्ये देखील शिवसेनेची अशीच स्थिती होती. येथे भाजपचे वर्चस्व आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या क्षीरसागर यांना मंत्रीपद दिले आहे. एकूणच शिवसेनेचे धोरण राज्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यावर असून त्या दृष्टीने प्रशांत किशोर यांच्या सल्लानुसार नियोजन करण्यात येत आहे.