शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांवर दमानियांनी केलेल्या आरोपांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 17:29 IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्याप्रकरणाची चौकशी कऱण्याचे आदेश महाराष्ट्र कारागृह विभागाकडून देण्यात आले आहेत. डीआयजी स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत चौकशी होणार आहे.
 
ऑर्थर रोड तुरुंगात भुजबळांची शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तसे पत्रच त्यांनी तुरुंग विभागाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांना पाठविले.
 
काय आहेत दमानियांचे आरोप-
कारागृहातच पाच फुटी टीव्ही बसविण्यात आला असून, त्यावर भुजबळ हिंदी सिनेमे पाहतात. शिवाय, त्यांना जेवणासाठी चिकन मसाला, दर दोन तासांनी फळे पुरविली जात असल्याचा आरोप दमानिया यांनी भूषणकुमार उपाध्याय यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. शिवाय, समीर भुजबळांसाठी तुरुंगातच दारू पोहोचविण्यात येत आहे. नारळपाण्याच्या नावाखाली तुरुंगात व्होडका पोहोचत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
 
भुजबळांना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीबाबत तुरुंगात काम करणाऱ्या लोकांनी माहिती दिल्याचा दावा दमानिया यांनी केला. जानेवारी महिन्यापासून हा सारा प्रकार सुरू आहे. समीर भुजबळ रोज सकाळी तीन तास मोबाइलवर बोलत असतात. त्यासाठी मोबाइल जॅमरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा दमानिया यांनी उपाध्याय यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. भुजबळांना न्यायालयात हजर करताना नियम धाब्यावर बसवून अनेक लोक त्यांना भेटले. यात मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळी होती. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या येऊनही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
 
 - अंजली दमानिया यांची तक्रार मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. दमानिया यांनी यापूर्वी जे आरोप केले होते त्याबाबत याआधीच त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली होती, असेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले.