शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

मुंबईच्या महापौरांवर लाचखोरीचा आरोप

By admin | Updated: March 30, 2015 13:35 IST

महापौर स्नेहल आंबेकर यांनी ठेकेदार व स्थानिक नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन निधी वाटप केल्याची तक्रार एसीबीकडे मनसेने केली आहे.

 शेफाली परब

मुंबईच्या महापौर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीच्या जाळ्य़ात अडकण्याची शक्यता आहे. विकासकामांसाठी राखीव निधीचा मोठा वाटा शिवसेनेने लाटल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. मात्र महापौर स्नेहल आंबेकर यांनीच ठेकेदार व स्थानिक नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन निधी वाटप केल्याची तक्रार एसीबीकडे करीत मनसेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. २0१५-२0१६च्या कर वाढविणार्‍या या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठल्यानंतर चारशे कोटींचा वाढीव निधी विकासकामांसाठी राखून ठेवण्यात आला. परंतु जिसकी लाठी उसकी भैस या म्हणीनुसार पालिकेतील बलाढय़ नगरसेवकांच्या प्रभागांकडे या निधीची गंगा वाहिली. खरोखरच या निधीची गरज असलेले प्रभाग मात्र विकासकामांपासून वंचित राहिले. या असमान निधी वाटपाबाबत विरोधी पक्षातच नव्हे तर शिवसेनेच्या गोटातही असंतोष निर्माण झाला. याबाबत पालिका महासभेत जाब विचारणार्‍या काँग्रेस नगरसेविकांनाच निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. निलंबित नगरसेवकांनी आपल्या दालनात येऊनच माफी मागावी, असं आडमुठीचं धोरण अवलंबत पालिकेच्या सहा महासभांचा महापौरांनी खेळखंडोबा केला. महापौर नियुक्तीनंतर स्नेहल आंबेकर यांच्या कार्यप्रणाली तसेच कार्यक्षमतेबद्दल राजकीय वतरुळात भुवया उंचाविल्या गेल्या होत्या. मुळातच पहिल्यांदाच नगरसेविका या पदावर निवडून आलेल्या आंबेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडताच त्यांचा एकंदर राजकीय अनुभव-अभ्यास लक्षात घेता त्या या पदाची प्रतिष्ठा टिकवू शकतील का? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.महापौरपदाची धुरा सांभाळताच लाल दिव्याच्या गाडीचा हट्ट धरीत आंबेकर यांनी लोकप्रतिनिधींच्या संशयाला पुष्टी दिली. तद्नंतर डेंग्यू व स्वाइन फ्लूबाबत वादग्रस्त विधाने करीत त्यांनी अकलेचे तारे तोडले होते. हास्यास्पद विधाने करणार्‍या या महापौरांचे नाव आता करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारामध्ये गोवले जात आहे. पालिकेतील कथित टक्केवारीचा व्यवहार यापूर्वीही अनेकवेळा चर्चेत आला आहे. परंतु या टक्केवारीत तथ्य किती हे कधी कोणी उजेडात आणण्याचे धाडस केले नाही. ठेकेदार महापालिका चालवितात, असेही अनेकवेळा दिसून आले आहे. अनेक प्रकल्पात ठेकेदार म्हणेल ती पूर्वदिशा ठरली आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत, मात्र मुंबईच्या प्रथम नागरिकाकडे बोट दाखविण्याची हिंमत तसेच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची पालिकेच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ आहे