शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांवरील आरोपाने गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:45 IST

राज्य सरकारमधील एका राज्यमंत्र्यांवर एका महिलेने केलेल्या आरोपावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ माजला.

मुंबई : राज्य सरकारमधील एका राज्यमंत्र्यांवर एका महिलेने केलेल्या आरोपावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ माजला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्या महिलेचे निवेदनच वाचून दाखविल्याने, ‘ते’ राज्यमंत्री कोण? याची चर्चा रंगली.सांगली येथील एका महिलेने पत्रकार परिषद घेऊन एका राज्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारने त्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा अजित पवार यांनी केली. पवारांनी संबंधित महिलेचे निवदेन वाचून दाखविताच, सभागृहात एकच गदारोळ झाला. नाव घेऊन आरोप करा, अशी मागणी सत्ताधारी बाकांवरून झाली. मात्र, आपण आधी नोटीस दिलेली नसल्याने व प्रकरण अचानक समोर आल्यामुळे आपण त्या राज्यमंत्र्यांचे नाव घेत नाही, असे पवार यांनी सांगितले.या आरोपानंतर सभागृहात दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. अनेक सदस्य बोलायला उभे राहिले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्रिमहोदयांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे तीन-तीन वेळा सांगितले, पण सभागृहात अनेक मंत्री हजर असताना कोणीही उठून त्यांना प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे नाव घेऊन पुन्हा निर्देश दिले. त्यांचेही या वेळी सभागृहात लक्ष नव्हते. त्यांचेही दोन-तीन वेळा नाव पुकारल्यावर गृहराज्यमंत्री उभे राहिले व ‘चौकशी करतो’ असे बोलून खाली बसले.विरोधकांनी नाव घेऊन बोलावे, नुसते एक राज्यमंत्री म्हणाल्याने सर्वच मंत्र्यांबद्दल संशयाचे वातावरण तयार होते, असा आक्षेप घेत, एकनाथ खडसे यांनी सराकरची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. शिवाय ज्या महिलेविषयी आपण बोलत आहात, त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याची आपली माहिती असल्याचे खडसे म्हणाले. त्यानंतर, पुन्हा सभागृहात गदारोळ माजला. शेवटी विरोधकांनी सभात्याग केला.