शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप, 'राजगड'वर नेमकं काय घडलं?; मनसेनं केला खुलासा

By प्रविण मरगळे | Updated: January 9, 2024 15:54 IST

जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधवबद्दल अनेक तक्रारी आहेत असं मनसेनं सांगितले.

मुंबई - मनसे पदाधिकारी आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले. जाधव यांच्या या आरोपानंतर मनसेने यावर सविस्तर खुलासा केला आहे. महेश जाधव यांच्याबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे सातत्याने येत होत्या. कामगारांची फसवणूक करून जाधव त्यांच्यावर अरेरावी करायचे त्यामुळे त्या वादातून कामगारांनीच जाधव यांना मारहाण केल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी सांगितले आहे. 

या घटनेवर मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून महेश जाधव यांच्याविरोधात कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे येत होत्या. त्याबाबत चार पाच वेळा पक्षाने त्यांना बोलावलेही होते. जाहीर सक्त ताकीद दिली होती. कामगारांच्या हितासाठी तुमचे धोरण बदला. कामगारांचे नुकसान करू नका असं सांगितले होते. आज ते कामगार न्याय मागायला राजगडवर आले होते. तेव्हा यापुढे ही युनिट तुम्ही पाहायची नाही. पक्षाकडून दुसरा व्यक्ती युनिटवर नेमली जाईल असं पक्षाने सांगितले. तरीही तो कामगारांसोबत वाद घालू लागला. त्यात ज्या कामगारांना महेश जाधव यांनी फसवलं त्यांनीच जाधव यांना मारहाण केली असं त्यांनी स्पष्ट सांगितले. 

त्याचसोबत महेश जाधव यांचे आजचे नाही. जाधव यांच्याबद्दल अनेक खंडणीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. कामोठे पोलीस ठाण्यात महेश जाधवबद्दल अनेक तक्रारी आहेत. एका मुलीचं अपहरण करून तिला ३ दिवस डांबून ठेवले होते हेदेखील कामोठे पोलीस ठाण्यात नोंद आहे. सातत्याने महेश जाधव यांच्याविरोधात अशा तक्रारी येत होत्या त्यामुळे पक्षाने जाधव यांच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं होते. मात्र त्याआधीच कामगारांच्या वादातून महेश जाधव यांनी मार खाल्ला.कामोठे परिसरातील विविध बिल्डरकडे चौकशी केली तर तेथील बिल्डरही खंडणीखोर कोण आहेत हे सांगतील. महेश जाधव यांच्या आरोपांनी आमची अब्रु जात नाही. लोकशाही आहे त्यांना जे काही बोलायचे असेल ते बोलतील असा पलटवारही मनसेच्या योगेश चिल्ले यांनी महेश जाधव यांच्यावर केला. 

काय आहे प्रकरण?महेश जाधव हे मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नुकतेच फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले. अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी मला बेदम मारलं. कसाबसा जीव वाचवून माथाडी कामगारांनी मला तिकडून पळवून आणले. या लोकांनी मला वाचवलं. राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारलं आहे. हे नेमकं काय आहे? मागील २० वर्ष मी राज ठाकरेंसोबत घालवली. ते दाखवतात एक आणि करतात एक. राज ठाकरेंचा पक्ष फक्त खंडणीखोर आहे असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरे