शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

परिवहन विभागाच्या सर्व सेवा आॅनलाइन

By admin | Updated: November 1, 2015 00:51 IST

राज्य प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत १४ प्रकारच्या सेवा कार्यान्वित आहेत. त्या सर्व सेवा आॅनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू असून, येत्या २६ जानेवारीला त्या सुरू होतील, अशी माहिती

ठाणे : राज्य प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत १४ प्रकारच्या सेवा कार्यान्वित आहेत. त्या सर्व सेवा आॅनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू असून, येत्या २६ जानेवारीला त्या सुरू होतील, अशी माहिती राज्याच्या परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. मुदतबाह्य झालेल्या परवाने नूतनीकरणाबाबत शासनाने राबवलेल्या अभय योजनेची माहिती घेण्यासाठी त्या शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या वेळी त्यांनी मोहिमेला ठाणे, कल्याणात अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट करून, या मोहिमेसाठी येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगितले, तसेच त्यानंतरही १५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान, विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. परवानाधारकांनी मुदतबाह्यपरवान्यांचे नूतनीकरण करून घेतले नाही, तर ते कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील. आरटीओ आणि पोलिसांनी नल्ला गाड्यांची (विना परवाना बोगस रिक्षा) ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये कळवा-मुंब्रा आणि भिवंडीचा समावेश आहे. जप्त होणारी वाहने साकेत ग्राउंडमध्ये ठेवली जाणार असून, तेथे सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले.पोलिसांचे पुरेपूर सहकार्य : शहर पोलीस आयुक्तालयात नोंदणी रद्द झालेल्या वाहनांविरोधात आरटीओ विभाग जी मोहीम हाती घेणार आहे त्या मोहिमेला शहर पोलीस पुरेपूर सहकार्य करणार असल्याचे ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.नोंदणी रद्द वाहने जेसीबीने बाद करणारयापुढे नोंदणी रद्द होणारी वाहने जेसीबीने तोडून बाद करण्यात येणार आहेत. पूर्वी नोंदणी रद्द वाहनांचे तुकडे करून ती बाद केली जात होती. मात्र, ते तुकडे पुन्हा वेल्डिंग करून जोडले जात असल्याने, ही वाहने पुन्हा रस्त्यांवर धावतात. त्यामुळे आता ती वाहने धावणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती ठाणे आरटीओ अधिकारी विकास पांडकर यांनी दिली.लवकरच १ लाख नवीन परवानेराज्यात लवकरच १ लाख नवीन परमीट काढण्यात येणार आहेत. मात्र, मुदतबाह्य होणाऱ्या परवानाधारकांना यापुढे कोणत्याच लॉटरी पद्धतीत भाग घेता येणार नसल्याचेही सेठी यांनी सांगितले.