शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच राजकीय पक्षानी प्रचारामध्ये घेतली आघाडी

By admin | Updated: February 17, 2017 12:58 IST

सर्वच राजकीय पक्षानी प्रचारामध्ये घेतली आघाडी

सर्वच राजकीय पक्षानी प्रचारामध्ये घेतली आघाडीसोलापूर : महापालिका निवडणुकीत आता चांगले रंग भरू लागले असून, अंतिम टप्प्यामध्ये भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रभागातील दाट वस्तीच्या भागातील गणेशोत्सव मंडळे, संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसात भाजप, काँग्रेस, एमआयएम नेत्यांच्या जाहीर सभा झाल्यामुळे त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण होऊन चिन्हांचे वाटप झाल्यानंतर ८ फेब्रुवारीपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला. सुरुवातीचे एक-दोन दिवस थंड वाटणारा प्रचार पदयात्रांच्या माध्यमातून गतिशील झाला. यंदा प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांना सहकारी उमेदवारांची साथ लाभत आहे. होटगी रस्ता, विजापूर रस्ता आणि जुळे सोलापूर परिसरात उमेदवारांनी एकत्र येऊन पदयात्रा काढल्याचे दिसून आले. शहराच्या गावठाण भागातही प्रमुख उमेदवार एकत्र येऊन प्रचार करताना दिसून येत आहेत.सोलापूर हे उत्सवी शहर आहे. येथे गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीसह विविध उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ते साजरे करणारी अनेक मंडळे प्रभावी आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने या मंडळांच्या कार्यकर्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. गल्लोगल्ली असणाऱ्या या मंडळांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उमेदवारांकडून ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. एखाद्या गल्लीतील मंडळाने पाठिंबा जाहीर केला की, तेथील हजार-बाराशे मतांची चिंता मिटते, असा उमेदवारांचा अनुभव असल्यामुळे याही निवडणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना गोंजारले जात आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सभांचा माहोल आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस अली अजीजी यांच्या सभेनंतर सभांचे सत्र सुरू झाले. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची सभा झाली. राणे यांचे टीकास्त्र विरोधकांच्या वर्मी लागणारे असले तरी मतदारांसाठी त्यांची सभा आनंद देणारी असते. त्यांच्या आसार मैदान आणि कर्णिकनगरमधील सभेला मोठा प्रतिसाद लाभला. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपासून जाहीर प्रचाराला प्रारंभ केला. त्यांनी विरोधकांवर टीका करताना विकासाचे मुद्देही मांडले. गेल्या दोन दिवसांपासून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे येथे ठाण मांडून आहेत. त्यांच्याही सभा गाजत आहेत. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत त्यांची बुधवारी संयुक्त सभा झाली. याशिवाय भाजपने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोेले यांचीही सभा आयोजित केली होती. एकूणच सभा, पदयात्रा आणि होम टू होम प्रचारात सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. -------------------------वैयक्तिक भेटीगाठींना महत्त्वदिवसभरात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार जरी एकत्र येऊन प्रचार करताना दिसून येत असले तरी प्रत्येकानेच वैयक्तिक गाठीभेटींना महत्त्व दिले आहे. मतदारांची सकाळची वेळ घाईची असते. त्यानंतर नोकरी, व्यवसायात त्यांचा दिवस जातो. मतदार सायंकाळी जेव्हा घरी येतो तेव्हा उमेदवार त्यांना घरी जाऊन भेटत आहेत. मतदारही उमेदवार स्वत: येऊन भेटून गेल्याचे समाधान मानत आहेत.