शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

भाजपाला रोखण्याचे सर्वच पक्षांपुढे आव्हान!

By admin | Updated: February 20, 2017 01:25 IST

स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणे हे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसमोरील, तर भाजपाला बहुमतापासून रोखणे हे इतर सर्वच राजकीय पक्षांसमोरील

रवी टाले / अकोलास्वबळावर बहुमताचा आकडा गाठणे हे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसमोरील, तर भाजपाला बहुमतापासून रोखणे हे इतर सर्वच राजकीय पक्षांसमोरील आव्हान असल्याचे चित्र, अकोला महानगरपालिकेत आहे. महापालिका स्थापनेपासून प्रथमच तुटलेली भगवी युती, ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक पळवून राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली काँग्रेसची गोची, मजलीस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व भारिप-बहुजन महासंघाच्या गोटात निर्माण झालेली चिंता आणि हद्दवाढीमुळे शहरात समाविष्ट झालेला ग्रामीण भाग व चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे बदललेली समीकरणे, या पार्श्वभूमीवर अकोला महापालिकेची चवथी निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. गेल्या निवडणुकीत बंडखोरी करून विजयी झालेल्या नगरसेवकांना सोबत घेऊन, अखेरच्या अडीच वर्षांत मनपाची सत्ता ताब्यात घेतलेल्या भाजपाने या वेळी स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे, तर काहीही करून ते होऊ न देण्याची इतर सर्वच पक्षांची रणनीती आहे; परंतु सर्वच पक्षांमध्ये रंगलेल्या अंतर्गत कलगीतुऱ्यांचा परिणाम, काही प्रभागांमध्ये अनपेक्षित निकाल लागण्यात होऊ शकतो आणि त्यामुळे सत्ता स्थापनेच्या समीकरणांमध्येही उलटफेर होऊ शकतो. महापालिका स्थापनेपासून प्रथमच भाजपा व शिवसेना स्वतंत्ररीत्या लढत असले तरी, उभय पक्षांची शहरातील प्रभावक्षेत्रे बव्हंशी वेगवेगळी असल्याने त्यांच्या संख्याबळावर युती तुटल्याचा फार परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही; मात्र शिवसेनेतील बडे प्रस्थ असलेल्या गुलाबराव गावंडे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्याने शिवसेनेला तगडा झटका बसला आहे. त्यामधून सावरून मनपातील सत्तास्थापनेच्या खेळात निर्णायक खेळी करण्याइतपत संख्याबळ मिळविणे हे स्थानिक सेना नेतृत्वापुढील आव्हान आहे. गावंडेच्या राकाँ प्रवेशाचा निकालावर होणारा परिणाम अकोल्यातील स्थानिक राजकारणास नवे वळण देणारा ठरू शकतो. दुसरीकडे राकाँने काँग्रेसचे नगरसेवक पळवून त्यांना उमेदवारी दिल्याने उभय पक्षांमधील संबंध विकोपास गेले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बसलेला हा झटका, स्थानिक नेत्यांमध्ये उफाळलेल्या संघर्षामुळे आधीच कमकुवत भासत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी वर्मी बसलेला घाव ठरू शकतो. हे कमी की काय म्हणून, काँग्रेसची भिस्त असलेल्या अल्पसंख्याक मतपेढीवर नजर ठेवून असलेल्या एमआयएमनेही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. मनपात खाते उघडण्याची अपेक्षा करीत असलेल्या एमआयएमचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, हे २३ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार असले तरी, तो पक्ष काँग्रेसचे संख्याबळ घटविण्यास नक्कीच हातभार लावू शकतो. नेमक्या याच कारणामुळे राकाँ आणि काही प्रमाणात भारिप-बमसंनेही एमआयएमची धास्ती घेतली आहे.