शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच नेत्यांना सोईच्या उमेदवाराचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 01:47 IST

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले

रहाटणी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून, सोईचा उमेदवार शोधण्याची धडपड सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये सध्या सुरू आहे. त्यातूनच इतर पक्षांतील प्रभावी चेहरे आयात करण्यावरही भर दिला जात असून, या निवडणुकीत उमेदवारीत निष्ठेपेक्षा पैसाच भारी ठरणार, असे चित्र दिसत आहे.शहरातील १२८ उमेदवारांची निवड करताना राजकीय पक्षांचा कस लागत असताना आता आयात उमेदवारांवर भर दिला जात आहे. त्यातूनच काठावर असलेल्यांनी पक्षांतराला सुरुवात केली आहे. आपल्या पक्षाच्या गळाला कोणता मोठा मासा लागेल, यासाठी सर्वच पक्षांतील दिग्गज मंडळी जिवाचा आटापिटा करताना दिसून येत आहेत. कोण कोणत्या पक्षात जातो यावरूनच निवडणुकीचे गणित ठरणार आहे. महापालिका निवडणुका आल्या, की अनेक पक्षांच्या अंतर्गत गटातटांचा संघर्ष उफाळू लागतो. माझा गट प्रभावी की त्याचा हे सिद्ध करण्यासाठी पक्षांतर्गत शक्ती प्रदर्शन घडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. एखाद्या गटाला जास्त जागा जाऊ नयेत म्हणून देखील कुरघोडीचे राजकारण होताना दिसून येत आहे. सध्या काही पक्षात उमेदवार आयात करण्याकडे भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. बरेचदा पक्षातील प्रस्थापित नेत्याला आपल्याच पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची डोकेदुखी नको म्हणून नवीन चेहरा लादला जातो. स्वत:ची राजकीय उंची वाढविण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांचे पंख छाटणे हा सर्वात प्रभावी फंडा राहिला आहे. याही निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. दसरा-दिवाळीच्या मूहूर्तावर अनेकांनी आपापल्या प्रभागांमध्ये आपल्या वजनाची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. या गोष्टीकडेही वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची नजर असणार आहे. त्यातून आपल्या सोयीचा चेहरा निवडणे सोपे जाणार आहे.याशिवाय दावेदारीसाठी विजयाचे गणित जुळविताना जातीय समीकरणासोबतच आर्थिक सुबत्ता हा महत्त्वाचा निकष आहे. यापुढे पक्षनिष्ठा, जनसंपर्क, सामाजिक जीवनातील वर्तणूक या बाबींना गौण स्थान दिले जात आहे. महिला आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार महिलेपेक्षा त्यांच्या पतिराजाचे राजकीय वजन तपासले जात आहे. यातूनच पक्षांतराची प्रक्रियाही जोर धरत आहे. (वार्ताहर)>नाकापेक्षा मोती जड राजकारणात आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा नको, आपलेच सर्वत्र वर्चस्व हवे अशी इच्छा शहरातील अनेक दिग्गज राजकारण्यांची आहे. त्यामुळे बरोबरीच्या एखाद्याने पक्षात प्रवेश केला, तर तो आपल्याला जड होणार नाही, याची खातरजमा काही मंडळी करत असल्याची चर्चा सध्या शहरात आहे. मागून आला अन् तिखट झाला अशी म्हणायची वेळ येऊ नये, म्हणून काहीजण सावध भूमिका घेत आहेत. पालिका हद्दीत जमिनीला सोन्याचे भाव आल्याने अनेकांकडे अमाप पैसा आहे . इच्छुकांचे फुटले पेवकाहीजण फक्त पैसाच्या जोरावर निवडणुकीची तयारी करताना दिसून येत आहेत. परवापर्यंत राजकारणाचा गंध नसणाऱ्यांचे सध्या ठिकठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून बॅनर झळकू लागले आहेत. तर काहींनी प्रभागरचनेनंतर दुसऱ्याच प्रभागात काम व प्रचार सुरू केल्याने अनेक पक्षांत आताच बंडाळी सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही जण फक्त त्या प्रभागातील इच्छुक उमेदवारावर प्रभाव टाकून आर्थिक देवाणघेवाण करून पाठिंबा जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. >वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी वाढला संपर्कसध्या शहरातील अनेक मंडळी विविध पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या संपर्कात आहेत. पक्ष कोणताही असोे; मात्र मला नगरसेवक होणे आहे, अशी अनेकांची भावना झाल्याने अनेकांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. या निमिताने लवकरच शहरात पक्षांतर सोहळे सुरू होतील आणि त्या पाठोपाठ उमेदवारीची घोषणा होईल. शहरातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली असल्याने त्या त्या प्रभागातील इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. ते पक्षात आले तर आपले काय अशी भीती निर्माण झाल्याने ते आपल्या पक्षात कसे येणार नाहीत यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. सदस्य नोंदणीला सुरुवातराष्ट्रीय पक्षासह प्रादेशिक पक्षांकडून सदस्य नोंदणीचे आकडे अभिमानाने सांगितले जातात. प्रत्यक्षात मात्र कोणता पक्ष शहरातील कोणत्या भागापर्यंत पोहोचला हे निवडणुकीत उमेदवारी देताना दिसून येते. पक्ष संघटनातील उणिवा खऱ्या अर्थाने निवडणूक काळात उमेदवार देताना अधोरेखित करता येतात. काही पक्षांना उमेदवार मिळणेही कठीण आहे.