शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

परिषदेच्या चारही जागा युतीकडे ?

By admin | Updated: January 13, 2015 05:28 IST

विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे मतदान होणार आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे मतदान होणार आहे. निवडून येण्यासाठी तब्बल १४४ मतांचा कोटा लागणार असल्याने या चारही जागा भाजपा-शिवसेनेच्या पदरात पडू शकतात.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपाचे अ‍ॅड. आशिष शेलार यांनी राजीनामा दिल्याने आणि राष्ट्रवादीचे विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूक असल्याने प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे मतदान घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरविले आहे. त्यामुळे एकेक जागा जिंकण्यासाठी मतांचा कोटा निश्चित होईल. एकूण सदस्य संख्या भागिले दोन अधिक एक याप्रमाणे कोटा ठरेल. विधानसभेचे एकूण संख्याबळ २८८ आहे. मात्र भाजपाचे गोविंद राठोड आणि शिवसेनेचे बाळा सावंत यांचे निधन झाल्याने सध्या २८६ आमदार आहेत. त्याच्या निम्मे म्हणजे १४३ आणि अधिक एक म्हणजे १४४ मतांचा कोटा प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी लागेल. काँग्रेसचे ४३ तर राष्ट्रवादीचे ४२ आमदार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन लढले तरी त्यांचे संख्याबळ ८५ होते. १४४ चा टप्पा कोणत्याही परिस्थितीत त्यांना गाठता येणार नसल्याने आघाडीच्या पारड्यात एकही जागा जाणार नाही. या चारपैकी दोन जागांची मुदत ही ७ जुलै २०१६ रोजी संपणार आहे. तिसऱ्या जागेचा कालावधी २७ जुलै २०१८ पर्यंत असून चौथ्या जागेचा कालावधी २४ एप्रिल २०२० पर्यंत आहे. शिवसेनेकडून एप्रिल २०२० मध्ये कार्यकाळ पूर्ण होणारी जागा मिळावी, असा आग्रह धरला जाऊ शकतो. भाजपाकडून इच्छुक असलेल्यांचा आग्रहदेखील जास्तीत जास्त कालावधीची जागा आपल्याला मिळावी असाच असेल. या परिस्थितीत उमेदवार आणि त्यांचा कार्यकाळ ठरविताना भाजपा नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. (विशेष प्रतिनिधी)