शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नीरा पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे भरली, अनेक ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:54 IST

नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत.

नीरा : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. नीरा नदीवरील वीर धरणात नीरा-देवघर, भाटघर, गुंजवणी या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. त्यामुळे वीर धरण शंभर टक्के भरल्याने तीन दरवाजे चार फुटांवर उचलून १४,००० क्युसेक्स वेगाने नीरा नदीत पाणी सोडले जात आहे.नऊ टीएमसी क्षमता असलेले वीर धरण मागील चार-पाच दिवसांत शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे. धरण लाभक्षेत्रात जुलै, आॅगस्ट महिन्यात पाऊस झाला नव्हता तरी मोठ्या आशेवर ऊसलागवडी झाल्या; मात्र शेतकरी धास्तावला होता. आज रोजी सर्व धरणे शंभर टक्के भरून वाहू लागल्याने ऊसउत्पादक शेतकरी सुखावला आहे.या आठवड्यात वीर धरणातून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मंगळवारी सकाळी १३,००० क्युसेक्स वेगाने, तर संध्याकाळी १४,१११ क्युसेक्स वेगाने नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. बुधवारी सकाळी नीरा-देवघर धरणातून २,९३४ क्युसेक्स, भाटघर धरणातून २,१६७ क्युुसेक्स तर वीर धरणातून १४,१११ क्युसेक्स वेगाने दिवसभर पाणी सोडण्यात आले.पुणे व सातारा या जिल्ह्याच्या सीमेवर असणाºया वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेली भाटघर, नीरा-देवघर, गुंजवणी ही सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात येणाºया पाण्याची आवक वाढल्यावर वीर धरणातून वारंवार नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.>नीरा देवघर १०० टक्के भरलेवीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर एकूण ३४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी ३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून हे धरण १०० टक्के भरले आहे. तर, नीरा-देवघर धरणदेखील १०० टक्के भरले असून मंगळवारी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.आज अखेर एकूण २,०१७ मिलिमीटर पाऊस या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. तर, भाटघर धरणदेखील आॅगस्ट महिन्यातच १०० टक्के भरले असून भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी ८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजअखेर एकूण ६४२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. वीर धरणातून गेल्या आठवड्यामध्ये ३ वेळा पाण्याचा विसर्ग नीरा नदीत करण्यात आला असून, वीर धरणात येणाºया पाण्याची आवक बंद झाली.