शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलीबाबा अन् चाळीस चोर एकत्र; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 07:41 IST

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. परंतु, विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

अहमदनगर/कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेतृत्व असून, त्यांना हटविण्यासाठी अलीबाबा आणि चाळीस चोर एकत्र येत आहेत, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सर्वपक्षीय आघाडीवर केली. ते म्हणाले, त्यांनी हा प्रयोग २०१९ मध्येही केला होता. परंतु, त्याचा  परिणाम झाला नाही. कारण त्यांच्याकडे एकही राष्ट्रीय नेता नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. परंतु, विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे, तर परदेशातही वाढली आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून शुक्रवारी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावे लागत होते; मात्र शासनाकडे मोठी यंत्रणा असताना आपणही जनतेच्या दारी का जाऊ शकत नाही, असा विचार करून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

...म्हणून मी राजकारणात आलाे!  माझ्यातील नेतृत्वगुणांचा विकास विद्यार्थी परिषदेतच झाला. मला राजकारणात यायचेच नव्हते; पण संघटनेत होणारा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे मला सांगितले गेल्यानंतर मी राजकारणात आलो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे