शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

कर्नाळा अभयारण्यात अलर्ट

By admin | Updated: September 24, 2016 02:19 IST

उरणमध्ये संशयित घुसल्याचे शाळकरी मुलांनी पाहिल्याने गेल्या दोन दिवसांपासून उरण परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून सर्च आॅपरेशन सुरू आहे.

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- उरणमध्ये संशयित घुसल्याचे शाळकरी मुलांनी पाहिल्याने गेल्या दोन दिवसांपासून उरण परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून सर्च आॅपरेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर घनदाट जंगल असलेल्या कर्नाळा परिसरातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी पनवेल तालुका पोलिसांनी गस्त वाढवली आहे. चोवीस तास एक पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल शहरापासून १२ किमी अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. इसिसच्या कथित अतिरेक्यांनी या भागात रेकी केल्याचा खळबळजनक खुलासा पकडण्यात आलेल्या आरोपीने केला आहे. निर्जन स्थळ असल्याने येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा घाट इसिसने आखला होता. मात्र मुदब्बीर शेखचा साथीदार रिझवानच्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. अभयारण्यात नेमके कोण येते त्याची ओळख काय हे सांगता येत नाही. त्याचबरोबर अभयारण्याला कंपाऊंड नसल्याने कोणत्याही मार्गाने आतमध्ये प्रवेश करता येत असल्याने सुरक्षा धोक्यात होती. त्यामुळे पोलिसांनी वन विभागाच्या सहयोगाने याठिकाणी गस्त वाढवली होती. त्याचबरोबर पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी कर्नाळा परिसरातील गावांमधील सरपंच, प्रतिष्ठित ग्रामस्थांची बैठक बोलावून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. पनवेल तालुका पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून लाँग मार्च कर्नाळ्यात काढण्यात आला होता. यानिमित्ताने पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत माहिती करून घेतली.>खास पथक तैनातकर्नाळा अभयारण्य परिसरात एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यांच्याकडे चार एसएलआर देण्यात आल्या आहेत तसेच सुरक्षिततेची इतर साधने त्यांच्याकडे आहेत. पोलीस व्हॅनच्या माध्यमातून चोवीस तास हे पथक अभयारण्य परिसरात गस्त घालत आहे. >कर्नाळा अभयारण्य परिसरात आमचा बंदोबस्त पूर्वीपासून असतो. मात्र उरणमध्ये काही संशयित घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे सर्च सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही कर्नाळा अभयारण्यात गस्त वाढवली आहे.तसेच याबाबत आजूबाजूच्या ग्रामस्थांना अलर्ट करण्यात आले आहे. वन कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.- मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस, ठाणे