शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
3
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
4
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
6
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
7
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
8
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
9
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
10
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
11
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
12
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
13
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
14
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
15
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
16
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
17
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
18
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
19
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
20
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश

शराब मिलेगी अब शिशे में!

By admin | Updated: January 12, 2016 02:47 IST

देशी आणि विदेशी दारूच्या आवेष्टनासाठी केवळ काचेचाच वापर करावा, असा आदेश गृह विभागाने आज काढला. तसेच या बाटलीवर ‘फॉर सेल इन महाराष्ट्र स्टेट ओन्ली’ किंवा ‘फक्त महाराष्ट्र राज्यात

मुंबई : देशी आणि विदेशी दारूच्या आवेष्टनासाठी केवळ काचेचाच वापर करावा, असा आदेश गृह विभागाने आज काढला. तसेच या बाटलीवर ‘फॉर सेल इन महाराष्ट्र स्टेट ओन्ली’ किंवा ‘फक्त महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता’ असा उल्लेख करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६पासून करण्यात येणार आहे. प्लास्टीक बाटल्यांसाठी वापरण्यात येणारा पदार्थ हा पर्यावरणासाठी घातक आहे. कारण या बाटल्या अविघटनशील असल्याने पर्यावरणाची हानी होण्याची भीती असते. या बाटल्यांची विल्हेवाट सहजासहजी लावता येत नाही. त्या गटारे-नाले, मलनि:सारणाच्या अन्य ठिकाणी पडून राहिल्याने सार्वजनिक स्वच्छता आणि प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. प्लास्टीक हे काही प्रमाणात अल्कोहलमध्ये विद्राव्य होत असल्याने मानवी आरोग्यास धोका संभवतो. म्हणून दारू या बाटल्यांमधून न देण्याची मागणी काही संघटनांकडून शासनाकडे सातत्याने करण्यात येत होती. प्लास्टीकच्या बाटल्या वजनास हलक्या असल्याने त्यांची चोरटी वाहतूक करणे सोपे जाते. त्यामुळे शासनाला महसुलास मुकावे लागते. प्लास्टीक बाटल्यांमुळे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने संभवणारा धोका आणि तस्करी सोपी झाल्याने या बाटल्यांमध्ये दारू बाजारात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)टेट्रा पॅकला मनाईया आदेशानुसार देशी, विदेशी मद्य, बीअर, वाईन हे पेट वा टेट्रा पॅकमध्ये (प्लास्टीक) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. बीअरसाठी कॅनचा वापर करण्यास निर्बंध नसतील. स्पिरिटसाठी काचेच्या नवीन बाटल्याच वापरता येतील.