शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खिलाडी अक्षय कुमारनेही अनुभवला 'नकोसा' स्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 13:38 IST

बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारनं खासगी आयुष्यातील एका मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली आहे.  ''लहानपणी मीदेखील नकोसा स्पर्श अनुभवला आहे'', असे अक्षय कुमारने सांगितले आहे.

मुंबई, दि. 28 - बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारनं खासगी आयुष्यातील एका मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली आहे.  ''लहानपणी मीदेखील नकोसा स्पर्श अनुभवला आहे'', असे खिलाडी अक्षय कुमारने राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांनी आयोजित केलेल्या महिला तस्करीविरोधातील परिषदेत बोलत होता. 

या नकोशा स्पर्शाबाबत अक्षय कुमारनं सांगितले की, '' मी लहान होतो. त्यावेळी मी मित्राच्या घरीत जात असताना लिफ्टमॅननं मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यावेळी लिफ्टमॅननं माझ्या पार्श्वभागाला वाईट हेतून स्पर्श केला. त्या स्पर्शानं मला फारच विचित्र वाटले. त्यानंतर मी घरी गेलो आणि आईवडिलांना घडला प्रकार सांगितला. मग त्यांनी लिफ्टमनविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. आईवडिलांसोबत मी संवाद साधला म्हणून ते याविरोधात योग्य भूमिका घेऊ शकले''. यानंतरही त्या लिफ्टमननं आणखी एका मुलासोबत असेच काहीसे करण्याचा प्रयत्न केल्याचे माहिती समोर आली.

दरम्यान, लैंगिक शोषणावर बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, पालकांनीच पुढाकार घेऊन आपल्या मुलांना याबाबत जागरुक करणे गरजेचे आहे. लैंगिक शोषणाबाबत पालक आपल्या मुलांसोबत बोलू शकले तर अशा गोष्टींना नक्कीच आळा बसू शकतो.

आपण समाजाचे पहारेकरी होऊ- अक्षय कुमारमानवी तस्करीसारखा घृणास्पद गुन्हा पाहिला की या समाजाला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न पडतो. ही तस्करी आपल्या समाजाला गिळत चालली आहे. आपण सर्वांनी बळी पडणार्या लोकांना वाचवण्यासाठी समाजाचे पहारेकरी म्हणून काम केले पाहिजे. मी स्वत: दोन वर्षांमध्ये १० हजार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यामुळे मुलींना त्यांच्या हक्काची जाणिव करुन देणे आणि स्वसंरक्षण हे महिला तस्करीविरोधात लढण्यास मदत करतील असे मला वाटते. 

मानवी तस्करी घृणास्पद गुन्हा - मुख्यमंत्रीदरम्यान,  महिला आणि मुलांची तस्करी हा मानवतेविरोधातीलच गुन्हा मानला पाहिजे, एखाद्या व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेशी खेळणे हा सर्वात गंभीर गुन्हा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच परिषदेत केले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवी तस्करी नावाच्या राक्षसी गुन्ह्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मानवी तस्करी हा जगातील दोन नंबरचा ब्लॅक ट्रेड म्हणून ओळखला जातो, हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. महिलांची तस्करी म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाशी केलेला खेळच म्हणावा लागेल, एखाद्या व्यक्तीच्या हत्येपेक्षाही हीन दर्जाचा असा हा गुन्हा आहे. एकेकाळी मानवी तस्करीचा धोका केवळ गरीब वर्गापर्यंत मर्यादित होता, मात्र तंत्रज्ञान, माहितीसंवाद क्षेत्रात झालेली वाढ व इंटरनेटमुळे हा प्रश्न च्या दारात उभा ठाकला आहे. या गुन्ह्याला कोणत्याही सीमा नाहीत, त्याला जागतिक स्वरुप आलेले आहे. 

तस्करीला बळी पडलेल्या महिलांची केवळ सूटका करुन उपयोग नाही तर त्यांना पुन्हा स्वबळावर उभे करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मुस्कान मोहिमेंतर्गत तस्करीला बळी पडलेल्या १० हजार मुलांची सूटका करण्यात यश आले आहे. मानवी तस्करी करणारे गुन्हेगार तंत्रज्ञानात अत्यंत हुशार असतात त्यामुळे सर्व देशांनी कडक कायद्यांच्या मदतीने एकत्र प्रयत्न केल्यास हे प्रकार कमी करता येतील असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. 

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही महिला तस्करीबाबत राज्य सरकार आणि महिला आयोग करत असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. जगातील प्रत्येक देशातील प्रश्न वेगवेगळे प्रश्न असू शकतील मात्र महिलांचे प्रश्न सर्वत्र सारखेच आहेत. महिलांना एक वस्तू म्हणून जगभर पाहिले जाते, हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तस्करीतून महिलांची सूटका झाल्यावर त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न योग्य रितीने होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. 

यावेळेस दिशा परिवर्तनाची, सिक्युरिटी जस्टीस, रिस्टोरिंग फ्रिडम या पुस्तकांचे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला तस्करीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मांडलेल्या रिक्षाचे उद्घाटनही झाले. ही रिक्षा देशात सर्वत्र फिरुन महिला तस्करी विरोधात जागृती करणार आहे.