शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी पोटनिवडणुकीत अकोला पॅटर्न?; "ऋतुजा लटकेंनी बिनधास्त अर्ज भरावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:51 IST

डॉ. अभय पाटील हे अकोल्यातून काँग्रेसकडून २०१९ च्या निवडणुकीत उभे राहिले होते. तेदेखील शासकीय सेवेत होते.

अकोला - सध्या राज्यात अंधेरी पोटनिवडणुकीची बरीच चर्चा आहे. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी सध्या धोक्यात आहे. ऋतुजा लटके या शासकीय सेवेत असल्याने त्यांनी दिलेला राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले. मात्र शासकीय सेवेत असताना राजीनामा दिल्यानंतर तो नामंजूर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही अकोला येथे डॉ. अभय पाटील यांच्याप्रकरणात हे घडले आहे. 

डॉ. अभय पाटील हे अकोल्यातून काँग्रेसकडून २०१९ च्या निवडणुकीत उभे राहिले होते. तेदेखील शासकीय सेवेत होते. याबाबत अभय पाटील म्हणाले की, मी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होतो. माझा राजीनामा मी दीड महिन्यापूर्वी दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळी माझा राजीनामा मंजूर करणार नाही असं स्पष्ट सांगितले होते. मी न्यायालयीन बाबी ठेवल्यानंतर सचिवांनी सही करून दिली. परंतु तत्कालीन मंत्र्यांची सही हवी होती असं सांगण्यात आले. सचिवांच्या सहीनंतर खरेतर मंत्र्यांच्या सहीची गरज नव्हती. याच पद्धतीने ऋतुजा लटकेंबाबत प्रकार सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

बिनधास्त अर्ज भरायला हवात्याचसोबत १ महिन्यापूर्वी राजीनामा दिला असेल तर तो मंजूर व्हायला हवा. स्थानिक निवडणुकीत राजीनामा न देता निवडणूक लढवली जाते. निवडून आल्यानंतर राजीनामा दिला जातो. परंतु आता कायदेशीर प्रक्रिया आहे. शिवसेनेने पूर्ण ताकद लावावी. प्रत्येक उमेदवाराने काळजी घेणे गरजेचे आहे. मला जो त्रास दिला तोच ऋतुजा लटकेंना होत आहे. माझ्याकडे कोर्टात जाण्यासाठी वेळ नव्हता. शिवसेनेकडे वकिलांची टीम आहे. अर्ज भरून घ्यावा. या बाबींवर निवडणूक अधिकारी हरकत घेऊ शकत नाही. त्यामुळे अर्ज बिनधास्त भरावा. कायदेशीर बाबींचा अभ्यास करता येईल. अर्ज भरायला हवा असं मला वाटतं असं काँग्रेस नेते अभय पाटील म्हणाले. 

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माझी तयारी होती. मी निवडून येईल अशी खात्री होती. मी प्रत्येक गावात इतक्या वर्षापासून फिरत होतो. २५-३० वर्षापासून सामाजिक कार्य सुरू आहे. प्रत्येकाशी गाठीभेटी घेतो. गावकऱ्यांच्या अनेक समस्या मी सोडवल्या आहेत. मी आमदार, खासदार नसलो तरी प्रत्येकाला मदत करण्यासाठी मी तत्पर असतो. माझी २०२४ ची पूर्णपणे तयारी सुरू आहे. मी निवडून येईल असा विश्वास वाटतो असंही अभय पाटील यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv Senaशिवसेना