शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वीज कोसळून एक ठार

By admin | Updated: March 28, 2016 01:51 IST

पातूर तालुक्यात गारपीट; बलडाणा, वाशिम जिल्ह्यातही पावसाची हजेरी.

अकोला: जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला तालुक्यात सिसा बोंदरखेड येथे शेतात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीट झाली असून, तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळपासूनच अनेक भागांमध्ये वादळी वार्‍यासह हलक्या सरी कोसळल्या. आज दुसर्‍या दिवशी दुपारपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. दुपारी साडे तीन वाजेनंतर काही भागात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. अकोला तालुक्यातुव सिसा बोंदरखेड येथे सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास वीज अंगावर कोसळल्याने किशोर नागोराव वडतकार (३५) हे जागीच ठार झाले. कौलखेड परिसरातील वर्धमाननगरमध्ये बाळू मोहड यांच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे जीन्याचा टॉवर तुटला. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुपारपासून अधूनमधून वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. शिर्ला येथे जोरदार पाऊस झाला. आलेगाव परिसरात दुपारी गारपीट झाली. वाशिम जिल्ह्यात मेडशी परिसरात पावसाने हजेरी लावली. रिसोड तालुक्यात पिंपळखेड येथे वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. तर बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, नांदुरा, मलकापूर, चिखली, मेहकर परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वार्‍याने घरावरील टिनपत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या.