शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

अकोला - नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचे आगमन

By admin | Updated: August 30, 2016 17:46 IST

अकोल्याच्या राजाचे मंगळवारी सायंकाळी टाळ, मृदूंग आणि हरिनामाच्या घोषात शहरात आगमन झाले

- ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 30 - मुंबईच्या लालबागचा राजा नवसाला पाहण्यासाठी सर्वश्रृत आहे. तसाच अकोल्याचा राजा...लालबागचा राजाही नवसाला पावणारा आहे. अशा या अकोल्याच्या राजाचे मंगळवारी सायंकाळी टाळ, मृदूंग आणि हरिनामाच्या घोषात शहरात आगमन झाले. नागरिकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी केली होती. भावपूर्ण वातावरणात नागरिकांनी फुलांची उधळण करून लालबागच्या राजाचे स्वागत केले. 
 
लाडक्या गणरायाची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली तो बाप्पा पाहूणा म्हणून आपणा सर्वांच्या घरी लवकरच स्थानापन्न होणार आहे.  या विघ्नहर्त्याचे प्रत्येक गणेशभक्ताने जल्लोषात, वाजतगाजत स्वागत करण्याची अकोलेकरांनी जय्यत तयारी आरंभिली आहे. शहरात सर्वात आधी अकोल्याचा राजा...लालबागच्या राजाचे आगमन होतं. माळीपूरा एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गत ३५ वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. परंतु दहा वर्षांपासून मंडळातर्फे लालबागच्या राजाची गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जेवढी गर्दी होती. तेवढी गर्दी अकोल्याच्या राजाच्या दर्शनालाही होते. भाविक मनोभावे गणरायाला ५१, १0१, २0१ किंवा त्यापेक्षा अधिक नारळ अर्पण करतात आणि गणरायापुढे आपले दु:ख, दारिद्र्य आणि मनातील इच्छा प्रकट करतात. अनेक भाविकांना त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याच्या अनुभव आला आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, सचिव राजेश चंदनबटवे, कैलास रणपिसे यांनी दिली. लालबागच्या राजाची हुबेहुब मुर्ति घडविणारे जठारपेठेतील मुर्तिकार शिवा मोकळकर यांच्या घरी मंगळवारी सायंकाळी माळीपूरा एकता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी लालबागच्या राजाला घ्यायला आले. जठारपेठ भागातून टाळ, मृदूंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या जयघोषात लालबागच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी वाहनावरील लालबागच्या राजाला पायी चालत ओढत होते. ही मिरवणूक दादासाहेब दिवेकर चौक, सातव चौक, जठारपेठ चौक मार्गे रतनलाल प्लॉट चौकात पाहोचली. तेथून ही मिरवणूक टॉवर चौक, बसस्टँड चौक मार्गे गांधी रोड, टिळक रोड मार्गे माळीपूरा परिसरात पोहोचली. याठिकाणी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली.