शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वेस्थानकावर साडेबारा किलो गांजा जप्त

By admin | Updated: May 18, 2014 22:07 IST

अकोला रेल्वेस्थानकावर बेवारस स्थितीत साडेबारा किलो गांजाची बॅग रविवारी आढळली.

अकोला : रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीजवळ बेवारस स्थितीत साडेबारा किलो गांजाची बॅग आढळल्याची घटना रविवारी सकाळी १0.३0 वाजता घडली. रेल्वे पोलिसांनी गांजाची बॅग जप्त केली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीजवळ सकाळी प्रवाशांना एक बॅग आढळून आली; परंतु बराच वेळपर्यंत ही बॅग घ्यायला कुणी न आल्याने प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली आणि आधी रेल्वे स्टेशनवरील स्कॅनर मशीनमधून या बॅगची तपासणी केली असता, बॅगमध्ये काहीतरी काळा पदार्थ आणि दोन कांड्या असल्याचे दिसून आले. पोलिसांना बॅगमध्ये जिलेटीनच्या कांड्या असल्याची शंका आल्याने त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाने बॅगची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी बॅग कापून, त्यातील बंद पाकिट बाहेर काढले. पाकिट उघडले असता, त्यामध्ये गांजा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गांजाचे वजन केले. गांजा साडेबारा किलो भरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गांजाची किंमत ६0 हजार रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाची तस्करी करण्याच्या उद्देशाने हा गांजा रेल्वे स्टेशनवर आणला; परंतु गांजा आणणार्‍या अज्ञात व्यक्तीला संशय आल्याने, त्याने गांजाने भरलेली बॅग तिकीट खिडकीजवळ ठेवून पळ काढला असावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.