शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी घेतला नाही अजित पवार यांचा दूरध्वनी

By admin | Updated: August 5, 2016 21:17 IST

वाकड येथील पार्क स्ट्रीटला रस्त्यासाठी जागा देण्याचा विषयावरून महापौर शकुंतला धराडे आणि सत्ताधाऱ्यांत वादावादी झाली.

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. ५ : वाकड येथील पार्क स्ट्रीटला रस्त्यासाठी जागा देण्याचा विषयावरून महापौर शकुंतला धराडे आणि सत्ताधाऱ्यांत वादावादी झाली. संबंधित विषय मंजूर करावा, असा दूरध्वनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केल्याने सभा तहकूब न करण्याचा विचार महापौरांचा होता. याचवेळी सभा तहकूब करण्याविषयी सूचना देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महापौरांना दूरध्वनी केला. मात्र, हा दूरध्वनी त्यांनी घेतला नाही. ह्यदादांपेक्षा साहेब मोठे,ह्ण असे उत्तर महापौरांनी माध्यमांना दिले.

महापौरांनी सभा तहकुबीची सूचना का स्वीकारली नाही, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती. या घटनेचा मागोवा घेतला असता तहकुबीवरून जे वादळ झाले, त्याचे कारण वाकड येथील पार्क स्ट्रीटला महापालिकेच्या आरक्षणातील रस्ता देण्याचा शहर सुधारणा समितीचा विषय आजच्या विषयपत्रिकेवर होता. हा विषय भाजपाच्या नेत्यासंदर्भातील एका बिल्डरचा आहे. त्यामुळे हा विषय मंजूर करायचा नाही, यावर सत्ताधाऱ्यांचे एकमत झाले. त्यांनी याबाबत महापौरांनाही सूचना दिली होती. मात्र, महापौरांनी सभा रेटून नेण्याचा पयत्न केला. यावरून महापौर आणि सत्ताधारी यांच्यात वादावादी झाली.

पहिली सभा तहकूब केली, त्या वेळी अँटी चेंबरमध्ये ही सभा तहकूब करायची आहे, अशी सूचना पक्षनेत्यांनी महापौरांना केली. त्यानंतर सभा सुरू होण्यापूर्वी याविषयीची सूचना देण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी महापौरांना दूरध्वनी केला. तो दूरध्वनी महापौरांनी घेतलाच नाही, याविषयी चर्चा महापालिका वर्तुळात होती.

सभा संपल्यानंतर आपण दादांचा फोन का स्वीकारला नाही? असे पत्रकारांनी विचारले असता, महापौर धराडे म्हणाल्या, ह्यह्यएका विषयासंदर्भातील विषय मंजूर करण्याची मोठ्या साहेबांची सूचना होती. याच संदर्भात दादांनीही फोन केला होता. माझ्या दृष्टीने दादांपेक्षा साहेबच मोठे आहेत. त्यांचा आदेश मी पाळण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा आदेश मी पाळला.ह्णह्ण