शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

माफी मागितल्यामुळे अजित पवार, विखे-पाटील, धनंजय मुंडे त्रिकूट बेरोजगार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2016 08:30 IST

अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे हे त्रिकूट पुढचे काही दिवस तरी बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे वगैरे विरोधी पक्षांतील बुळबुळीत लोकांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. ‘व्यंगचित्रप्रकरणी ‘माफी माफी’ असे ते शिवसेनेच्या नावाने ‘खडे’ फोडीत होते, पण आम्ही समस्त मराठा समाजाच्या मायभगिनींपुढे विनम्र नतमस्तक झालो. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने आमच्या नावाने ‘खडे’ फोडणार्‍या या त्रिकुटाच्या दाताखाली खडे आले व त्यांचे दात पडले. या मंडळींच्या तोंडचा राजकीय घासच अशा प्रकारे काढून घेतल्याने पुढचे काही दिवस तरी हे त्रिकूट बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
आता आधी केलेल्या पापाचे प्रायश्‍चित्त घेऊन माफी मागण्याचे मंगलकार्य ही मंडळी कधी करणार आहेत? मराठा समाजातील लेकी-सुना न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत, पण लश्कर-ए-तोयबाची अतिरेकी इशरत जहांला ‘देशाची मुलगी’ ठरवून निरपराध संतीण ठरवण्याचा जो प्रकार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केला तो आज रस्त्यावर उतरलेल्या सर्व मराठा माय-भगिनींचा अपमान ठरावा. आज मराठा समाजाच्या मुली म्हणजे रणरागिणी आहेत. इशरत जहांला देशाची लेक बनवण्याचा जो घाणेरडा प्रकार झाला त्याबद्दल धनंजय मुंडे माफी मागणार आहेत का? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
उजनी धरणाचे हक्काचे पाणी मागणार्‍या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना उद्देशून ‘पाणीच नाही तर सोडणार कोठून? मग मुतता काय तिथं?’ असे उर्मट विधान करणार्‍या अजित पवारांनी समाजाची माफी मागितल्याची नोंद नाही. हे धरणातले पाणी शिवांबूने गढूळ करून शेवटी समस्त जाती-धर्मांच्या मुखातच जाणार होते ना? पण यावर थातूरमातूर उत्तरे देऊन अजित पवारांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पुन्हा अजित पवारांच्या या मुक्ताफळांबाबत शरद पवारांनी त्यावेळी कानावर हात ठेवले होते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
ओसाड गावच्या विखे-पाटलांविषयी काय बोलावे? आज त्यांना मराठा म्हणून जाग आली आहे, पण आज जागे झालेले विखे-पाटील अनेक वर्षे काँग्रेस पक्षात अडगळीत पडून अपमानाचेच जिणे जगत होते. त्यांना तेथे पायपुसण्याचीही किंमत नव्हती. शिवसेनेत येताच या पायपुसण्याचे भाग्य फळफळले व विखे पिता-पुत्रांना प्रथमच लाल दिव्याचा मान मिळाला होता. शिवसेनेमुळे त्यांना हा लाभ झाला. अन्यथा पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे यांचे राजकीय जीवन अल्पजिवीच ठरले असते, पण गांडुळांना कधी शेषनाग होता येत नाही व फूत्कारही सोडता येत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.