शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता!

By admin | Updated: April 27, 2015 04:19 IST

मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले असून, ३० एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबईमुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले असून, ३० एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे. मेहता सध्या पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. मेहता व गृहनिर्माण विभागाचे सतीश गवई यांच्यापैकी कोणाची नियुक्ती होणार यावर सध्या जोरदार खलबते रंगली असली तरी मेहता यांच्यावर शिक्कामोर्तब होईल, असे समजते. विद्यमान आयुक्त सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, मुंबईच्या शहर विकास आराखड्यावरुन शिवसेनेने कुंटे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचेही कारण त्यामागे असल्याचे बोलले जाते. मात्र, दोन वर्षांत येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे जॉनी जोसेफ यांच्यानंतर कुंटे हे दुसरे आयुक्त आहेत. ३० एप्रिल रोजी कुंटे यांना तीन वर्षे पूर्ण होतील. या पदासाठी गृहनिर्माण विभागाचे सहसचिव सतीश गवई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी यांच्या नावाची देखील चर्चा मुख्यमंत्र्यांकडे झाल्याचे वृत्त आहे. मात्र, चटर्जी पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत. करीर आणि गवई यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. शिवाय ‘शिवसेनेशी खेटण्याची ताकद’ हा महत्त्वाचा निकष देखील मुख्यमंत्र्यांकडे चर्चेला आल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेची निवडणूक भाजपाला एकहाती लढवायची आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांचा निकाल लक्षात घेता शिवसेनेला मुंबईत वाढू देण्याची तयारी भाजपा नेत्याची नाही. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना काही लोकप्रिय निर्णय घेऊ शकते. अशावेळी पक्षाला फायदा मिळवून देणारा आयुक्त भाजपला हवा आहे. या निकषावर मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी पहिली पसंती दिली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नजीकचे म्हणूनही मेहता यांची ओळख आहे. गेली सहा वर्षे ते महावितरणचे महाव्यवस्थापक होते.