शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेची ऐशीतैशी; एसटी बसेसवर राजकीय नेत्यांचे फोटो असलेल्या सरकारी जाहिराती कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 05:40 IST

आयोगाच्या पोस्टर्स काढण्याच्या सूचना

मुंबई : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊन ७२ तास उलटल्यानंतरही राज्यातील एसटी बसेसवरील सरकारी जाहिरातींची पोस्टर्स कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत मुंबई शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला विचारणा करताच एसटी महामंडळाला याबाबतच्या सूचना केल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, एसटीच्या मुंबई सेंट्रलसह इतर आगारांत आचारसंहितेच्या घोषणेनंतरही राजकीय पोस्टर्स कायम असल्याची बातमी ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने आगारांमधील पोस्टर्स काढले. मात्र एसटी बसेसवरील पोस्टर्स आणि स्टीकर्स बुधवारीही कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला विचारणा केली असता, एसटी महामंडळाला सूचना दिल्याचे सांगण्यात आले.एसटी प्रशासनाला बसेसवरील जाहिरातींबाबत विचारले असता, प्रशासनात संभ्रम दिसला. बसेसवर जाहिराती लावण्याचे काम खासगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे पोस्टर्स काढण्याचे काम संबंधित कंपनीचे आणि शासकीय विभागाचे असल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याउलट एसटी बसेसचा मालकी हक्क एसटी महामंडळाचा आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याची नोटीस महामंडळ आणि संबंधित बस आगार व्यवस्थापकाला देणार असल्याचे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले. परिणामी, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची तंबी देणारा निवडणूक आयोग या प्रकरणी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकसानभरपाई कोणाकडून वसूल?एसटी बसेसवर जाहिराती लावण्यासाठी कंपनीकडून महामंडळ ठरावीक शुल्क आकारणी करते. तसेच पोस्टर्स काढताना काहीही नुकसान झाल्यास, त्याची भरपाईही घेतली जाते. मात्र आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनाच एसटी बसेसवरील पोस्टर्स आणि स्टीकर्स काढावे लागत आहेत. काही एसटी बसेसवरील रंग निघून बसेसला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे याची नुकसानभरपाई प्रशासन कोणाकडून वसूल करणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग