शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये विमानतळाचा छुपा सर्व्हे

By admin | Updated: October 3, 2016 01:44 IST

शनिवारी खानवडी गावच्या बालधोंडी माळावर एका पथकाने पाहणी केली.

खळद : शनिवारी खानवडी गावच्या बालधोंडी माळावर एका पथकाने पाहणी केली. त्यांच्यासमवेत महसूल खात्यातील काही कर्मचारी होते. ही बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी या भागाकडे धाव घेतली. मात्र ते येईपर्यंत हे पथक निघून गेले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. वाघापूर, राजेवाडी, पारगाव, मुंजवडी, खानवडी या गावांतील ग्रामस्थ सरकार विश्वासात घेत नसल्याने संताप व्यक्त करीत आहेत. आम्ही ग्रामसभा घेऊन विरोध नोंदवला असतानाही हे पथक सर्व्हे करतेच कसा? हा ग्रामस्थांवर अन्याय आहे, हुकूमशाहीचे राजकारण जर स्थानिक नेते करणार असतील, शासन दडपशाही करणार असेल तर खानवडीकर इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाहीत अशी भूमिका ग्रामपंचायत सदस्य रमेश बोरावके यांनी मांडली. अधिक तीव्र आंदोलन करून ग्रामस्थ, महिला, मुले, गुरेढोरांसह तहसील कचेरीवर मोर्चा काढू असे माजी सरपंच रामदास होले यांनी सांगितले. (वार्ताहर) >ग्रामस्थांचे उपोषणपारगाव मेमाणे येथील ग्रामस्थांनी रविवारी गांधी जयंतीच्या औचित्याने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यापुढील सर्व लढा हा बाधित गावांनी एकत्रित येऊन लढण्याचे ठरले. या वेळी एखतपूर-मुंजवडीकर ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी, आमच्या घरादारावर नांगर फिरवणारे निर्णय शासन का घेते असा संतप्त सवाल केला. ग्रामपंचायत सदस्या दक्षता मेमाणे यांनी आजपर्यंत पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली जमीन कोणी जर हिरावत असेल तर येथील महिला आता शांत बसणार नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी त्यांच्याही पुढे एक पाऊल पुढे राहात तीव्र लढा देणार असल्याचे सांगितले.>ग्रामसभेत विरोधविमानतळाला विरोध होऊ लागला आहे. वाघापूर वगळता इतर गावांतून गामसभा घेऊन विरोध करण्यात आला असून, विमानतळाला इंचभरही जमीन देणार नसल्याचा या वेळी ठराव करण्यात आला आहे. जमीन आमच्या बापाची, नाही कोणाच्या बापाची, विमानतळ हाय हाय, अशा घोषणा देऊन राममंदिर सभागृह दणाणून गेला होता.