शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रावरून हवाई वाहतूक तीन महिन्यांत - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील नद्या, तलाव, धरण क्षेत्र, समुद्रकिनारा यांचा उपयोग जल-हवाई वाहतुकीसाठी करण्यासाठीची नियमावली तीन महिन्यांत तयार केली जाईल. सध्या विविध देशांच्या नियमांचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय जल वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.देशात जल हवाई वाहतूक सुरू करण्याच्या संधी तपासण्यासाठी स्पाइस जेटने शनिवारी येथील गिरगावच्या समुद्रात सी-प्लेनची चाचणी घेतली. या निमित्ताने गडकरींनी सांगितले की, देशाला ७,५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. १११ नद्यांचा उपयोग जल वाहतुकीसाठी होणार असल्याने आणखी २० हजार किमी जलमार्ग उपलब्ध होईल. त्यावर ४० नदी बंदरे विकसित केली जातील. या सोर्इंचा उपयोग जल हवाई वाहतुकीसाठीही होऊ शकतो.भारतीय हवाई क्षेत्र देशांतर्गत सेवांमध्ये जगात तिसºया व आंतरराष्टÑीय सेवांमध्ये चौथ्या स्थानी आहे. यासाठी ‘उडान’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आता जल हवाई वाहतूक ही ‘उडान टप्पा दोन’ असेल, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.‘कोडीअ‍ॅक १००’ या १४ आसनी उभयचर अर्थात, जमीन व पाणी दोन्हीवर उतरू शकणाºया विमानाद्वारे ही चाचणी घेण्यात आली. हे विमान जपानच्या सेतेउची होल्डिंग्स कंपनीचे आहे. त्यांच्याकडून स्पाइस जेटने ते भाडेतत्त्वावर घेतले. आम्ही लवकरच देशांतर्गत जल हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यास तयार आहोत. केंद्र सरकारच्या नियमांची प्रतीक्षा आहे, असे स्पाइस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले. सेतेउची कंपनीचे सीईओ काझुयुकी ओकाडा या वेळी उपस्थित होते.दृश्यतेचा फटकामुंबई शहर आणि उपनगरात सध्या दिवसभर धुलिकण आणि दवबिंदू यांचे मिश्रण असलेले ‘हेझ’आहे. त्यामुळे अंधुक असलेल्या वातावरणातील १५०० मीटरपेक्षा कमी दृश्यतेचा फटका चाचणीला बसला.विमानाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्टÑीय विमानतळावरून उड्डाणास विलंब झाला. तोपर्यंत मान्यवरांना समुद्रात बोटीत ताटकळत बसून राहावे लागले.राज्यात बांधणार ३० जेट्टी : जल वाहतुकीसाठी राज्यभरात ३० जेट्टी बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम मंडळाला केंद्र सरकार निधी देईल, तसेच ठाणे-विरार वाहतुकीसाठीही ५०० कोटी रुपये निधी दिला जाईल, असे गडकरींनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईNitin Gadakriनितिन गडकरी