मुंबई : पर्यटनाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाने आपल्या तिकिट दरांत ५० टक्क्यांपर्यंत दर कपात करण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने ही घोषणा केल्यानंतर आता अन्य कंपन्याही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आगामी काही दिवसांत अशाच घोषणा करण्याची शक्यता आहे.सोमवार १२ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली असून १८ जानेवारीपर्यंत सवलतींच्या दरातील तिकिटांची विक्री होणार आहे. १६ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यानच्या तिकिटांची खरेदी ग्राहकांना करता येणार आहे. देशातील ज्या विमानतळांवर एअर इंडियाची सेवा आहे, त्या शहरांनुसार दर कपातीची टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे. सर्वाधिक फायदा हा मुंबई-दिल्ली प्रवासासाठी उत्सुक प्रवाशांना होणार आहे. या मार्गावर थेट ५० टक्के सवलतीच्या दरात तिकिट मिळणार आहे. (प्रतिनिधी)
एअर इंडियाचा प्रवास ५०% स्वस्त
By admin | Updated: January 13, 2015 05:33 IST