शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग; ॲड. असीम सरोदे यांचा आमदारांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:33 IST

...यावरून आता शिवसेनेच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सरोदे यांच्या आरोपात तथ्य असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. तर, राजकीय सूडभावनेतून हे आरोप असून, यात तथ्य नसल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले. 

मुंबई : गुवाहाटीत गेलेले असताना त्या हॉटेलमध्ये कोणत्या आमदारांनी लिफ्टमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग केला, याचा शोध घ्यावा, असा गौप्यस्फोट वकील असीम सरोदे यांनी केला. यावरून आता शिवसेनेच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सरोदे यांच्या आरोपात तथ्य असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. तर, राजकीय सूडभावनेतून हे आरोप असून, यात तथ्य नसल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले. 

धाराशिवमध्ये पार पडलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात ॲड. सरोदे म्हणाले की, शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या एका एअर होस्टेसचा विनयभंग केला. हे कोणी केले, याचा महाराष्ट्राने शोध घ्यायला हवा. दारूच्या नशेत झिंगणाऱ्या आमदारांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. 

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी सरोदे यांच्या आरोपांचे समर्थन केले. तसेच या प्रकरणात तथ्य असून, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. शिंदे गटाचे  आमदार संजय शिरसाट यांनी सरोदे यांचे आरोप फेटाळून लावत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. सरोदे हे ठाकरे गटाचे पोपट म्हणून काम करतात. आमच्यावर आरोप केल्याशिवाय यांना काही सुचत नाही. दीड वर्षानंतर यांनी आता आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना कवडीची किंमत देत नाही, असे प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिले. 

टॅग्स :Asim Sarodeअसिम सराेदेShiv Senaशिवसेना