लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकणवासीयांचे आरामदायक आणि एसी प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवशाही एसटी मुंबई-रत्नागिरी मार्गावर शनिवारी मार्गस्थ होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी ‘शिवशाही’साठी प्रवाशाला ५५६ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ‘कोकणात वातानुकूलित एसटी सेवा सुरू होणार’ हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते.प्रवाशांची संख्या वाढावी आणि एसटीची अत्याधुनिक प्रतिमा प्रवाशांच्या मनात उमटवण्यासाठी एसटी प्रशासन भविष्यात विविध उपाययोजना राबवणार आहे. त्या योजनेंतर्गत वातानुकूलित एसटी प्रवास हा प्रयोग करण्यात येत आहे. कोकणातील वाढती प्रवासी संख्या पाहता शिवशाही ही अत्याधुनिक एसटी सर्वप्रथम मुंबई-रत्नागिरी मार्गावर सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर ती राज्यातील विविध भागांत लवकरच सुरू करण्यात येईल. एसटीची विश्वासार्हता आणि अत्याधुनिक व आरामदायक प्रवास यामुळे प्रवाशांना आणि प्रशासनाला फायदा होईल, असे मत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी व्यक्त केले. सध्याच्या ‘हिरकणी’ या निमआराम बस तिकिटांच्या जवळपास शिवशाहीचे तिकीट असल्यामुळे वातानुकूलित एसटीला प्रवासी नक्कीच चांगला प्रतिसाद देतील, असेही देओल यांनी सांगितले. एसटीची वातानुकूलित बस सेवा नसल्यामुळे खासगी वाहतूक यंत्रणा अवास्तव भाडे आकारीत होत्या. यामुळे एसटीने वातानुकूलित सेवा सुरू केली आहे. परिणामी, आगामी काळात राज्यातील सर्व भागांत ही एसटी सेवा प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरू करण्यात येणार आहे.‘शिवशाही’ मुंबई - रत्नागिरी एसटी थांबेमुंबई सेंट्रल - दादर - कुर्ला नेहरू नगर - पनवेल - रामवाडी - माणगाव - महाड - भरणा - नाकाम - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरीशिवशाही एसटी दर (रुपये)मुंबई ते रत्नागिरी ५५६ मुंबई ते संगमेश्वर४८३मुंबई ते चिपळूण ४२०खासगी वाहतूक यंत्रणा मुंबई ते रत्नागिरी या वातानुकूलित प्रवासाच्या अंतरासाठी ७०० रुपयांपर्यंत तिकीट आकारते. हाच प्रवास शिवशाही एसटीने ५५६ रुपयांत करता येणार आहे. ‘अॅडव्हान्स’ बुकिंग जोरातच्लक्झरी प्रकारात येणारी ‘शिवशाही’ची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई-रत्नागिरीसाठी १६ सीट आणि रत्नागिरी-मुंबईसाठी २८ सीटची अॅडव्हान्स बुकिंग झाल्याची माहिती एसटी सूत्रांनी दिली.च्मुंबईहून शनिवारी रात्री ९.४५ वाजता ही एसटी सुटेल आणि रत्नागिरीला रविवारी सकाळी ७ वाजता पोहोचेल. रत्नागिरी येथून रात्री १० वाजता सुटेल आणि मुंबईला सकाळी ७ वाजता पोहोचेल.
वातानुकूलित एसटी आजपासून धावणार
By admin | Updated: June 10, 2017 03:18 IST