शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड आडनावामुळे विमानप्रवास त्रासदायक

By admin | Updated: March 31, 2017 03:49 IST

खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे भाजपाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना

लातूर : विमान कंपन्यांनी उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे भाजपाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना बसतो आहे. आडनाव एकच आणि दोघेही खासदार. त्यामुळे ‘खासदार गायकवाड’ म्हटले की विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांपासून सुरक्षारक्षकांपर्यंत सर्वजण त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवित आहेत. या अकारण चौकशीचा वैताग आला आहे, अशा शब्दांत सुनील गायकवाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.खा. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर त्यांच्या विमानप्रवासावर बंदी आली. ते सुरुवातीला रेल्वेने आणि आता रस्तामार्गे प्रवासाला प्राधान्य देताहेत. मात्र लातूरच्या खासदारांना विमानप्रवास करताना ‘गायकवाड’ आडनावाचा फटका बसतो आहे. तिकिट बुक करताना हे आडनाव ऐकले की बुकिंगवाले कोणते गायकवाड? सुरुवातीचे नाव काय? काय करता? अशा प्रश्नांची सरबत्ती करत आहेत, अशी व्यथा त्यांनी मांडली. (प्रतिनिधी)सुरक्षारक्षकांकडून प्रश्नांचा भडीमारविमान कंपन्यांचे अधिकारीच काय तर सुरक्षारक्षकही त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. ही व्यथा सांगताना खा. सुनील गायकवाड म्हणाले, विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांपासून ते सुरक्षारक्षकांपर्यंत सारेच चौकशीसाठी थांबवितात ! विमानतळावर गेले की मला गायकवाड आडनावामुळे सारे शंकेने पाहातात. तिकीट बुक करताना हाच अनुभव येतो. कोणते गायकवाड ? तुमचा व्यवसाय काय ? तुम्हीसुद्धा खासदार आहात का ? कुठले खासदार आहात ? अशा प्रश्नांची सरबत्ती होते. चौकशीच्या नावे विनाकारण थांबवून ठेवले जाते. खिशातले सर्व वस्तू बाहेर काढून तो गायकवाड मी नाही हे समाजावावे लागते. मी तर काही गुन्हा केला नाही ? मग मला अशी वागणूक का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.