शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

मूर्तीकलेच्या गावात कलेला हवा राजाश्रय

By admin | Published: September 03, 2016 2:21 PM

वाशिम जिल्ह्यातून जाणा-या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील सावरगाव बर्डे या गावाला मुर्तीकलेचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे.

- नंदकिशोर नारे

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ३ -   जिल्ह्यातून जाणा-या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील सावरगाव बर्डे या गावाला मुर्तीकलेचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. परंतू चार दशकापासून आपल्या कलेची जोपासणा करणा-या कलावंतांना उद्योगवृध्दीसह सधनतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी आजही राजाश्रय मात्र मिळाला नाही. 
सावरगावातील मुर्तीकला तशी जूनीच परंतू गत ५ ते १0 वर्षात परंपरागत पध्दतीने मुर्ती बनविण्याच्या कलेला फाटा देवून तेथील मुर्तीकारांना बदलता काळ व मागणीनुसार आपल्या कलेला आधूनिकतेचे  रुप देण्याचे काम केले आहे. हस्तकलेतून मुर्तीची निर्मीती हा सावरगावच्या मुर्तीकारांच्या कलेचा गाभा. त्यामुळेच त्यांच्या कलेला पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून चांगली मागणी असते. माहितुनसार वाशिमसह अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ अमरावती , हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यामध्ये सावरगावच्या गणपती व मा दूर्गेच्या मुर्त्या स्थापन्यासाठी नेल्या जातात. ४0 वर्षापासून सावरगावात आपल्या जगतगुरु आर्टच्या माध्यमातून मुर्तीकलेची जोपासना करणाºया पंडूलाल रामचंद्र पेंढारकर यांनी कला जोपासण्यासाठी कराव्या लागणाºया एकूणच कृतीचा उहापोह केला. त्यानुसार पीओपी, मार्बल पावडरसह, शाळू मातीच्या माध्यमातून ते मुर्तीची निर्मीती करतात. मुर्तीसाठी लाकूड, अँगल व नारळीच्या काताचाही वापर केला जातो. मुर्तीच्या निर्मीतीसाठी लागणारे साहित्य ते राजस्थान व पुण्याहून खरेदी करतात. दरवर्षी साधारत: तिसºया महिण्यापासून मुर्तीकलेल्या कामाला ते प्रारंभ करतात. दरदिवशी किमान आठ ते दहा मजूर रात्रंदिवस मेहनत करुन सुबक अशा मुर्त्यांना आकार देतात. गणपती, देविच्या मुर्त्या किमान ५ हजार ते ४५ हजारापर्यंतची विक्री किंमत त्यांच्याकडून ठेवली जाते. परंतू केवळ व्यावसायीकता न जपता कलेची कदर करणाºयांना कमी अधिक रक्कमेत मागणीनुसार गणपती, देवीच्या मुर्त्या बनवून देण्याचे काम मुर्तीकार करतात. केवळ ब्लॉकच्याच नव्हे तर विना ब्लॉकच्याही मुर्त्या बनविण्यात सावरगावच्या पंडूलाल पेंढारकरांचे कसब वाखाणन्याजोगेच आहे. जवळपास प्रत्येकी सव्वाशे ते दिडशे गणपती, दूर्गादेवीच्या मुर्त्या दरवर्षी पश्चिम विदर्भाच्या कानाकोपºयात केवळ सावरगावच्या कलेची कदर करत सहज स्थापनेसाठी नेल्या जातात. गणेशोत्सवाचीही हिच परिस्थीती आहे. पंडूलाल पेंढारकरांप्रमाणेच मनोहर पेंढारकर, अमोल पेंढारकर, सिताराम रोतळे आदी मुर्तीकारही सावरगावची मुर्तीकलेची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून मेहनतीने जपण्याचे काम करताहेत. 
 
 
मुर्तीकलानिर्मीतीची कला जोपासण्याचे काम सावरगावचे मुर्तीकार जोमाने करीत असले तरी त्यांना शासनाचा मात्र कुठलाही आधार मिळत नाही. उद्योगाचे स्वरुप पाहता एका मुर्तीकाराला किमान १० ते १५ लाख रुपयाची गुंतवणूक खासगी उसणवारीतून करावी लागते. त्यामुळे उद्योगातूनच आपला उदरनिर्वाह भागवितांना त्यांची चांगलीच परवड होते.