शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 16:16 IST

असदुद्दीन ओवेसींच्या नेतृत्वातील AIMIM साठी यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महत्वाची आहे.

AIMIM in Maharashtra : मुस्लिम मतांच्या जोरावर असदुद्दीन ओवेसी आपल्या AIMIM पक्षाला हैदराबादमधून बाहेर काढून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी सर्वात आधी महाराष्ट्राची निवड केली. 2014 ला त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले. ओवेसी यांनी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात दोन जागा जिंकल्या. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकसभेची एक जागा जिंकली. अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगली एंट्री घेतली. पण, यावेळी ओवेसींनी आपला हात आखडता घेतला आहे. 

फक्त 14 जागांवर उमेदवार उभे केलेमहाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने फक्त 14 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. 2019 च्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी 44 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर 2014 च्या निवडणुकीत 24 जागांवर निवडणूक लढवली होती. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत एआयएमआयएमने यंदा केवळ 14 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता ओवेसी इतक्या कमी जागांवर निवडणूक लढविण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

AIMIM चे उमेदवारज्या 14 जागांवर पक्षाचे उमेदवार उभे आहेत, त्यामध्ये औरंगाबाद पूर्वमधून माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, औरंगाबाद मध्यमधून नासिर सिद्दीकी, धुळे शहरातून फारुख शाह अन्वर, मालेगाव मध्यमधून मुफ्ती इस्माईल कासमी, भिवंडी पश्चिममधून वारिस पठाण, भायखळामधून फैयाज अहमद खान, मुंब्रा कळव्यातून सैफ पठाण, वर्सोवामधून रईस लष्करिया, सोलापूरमधून फारूख शाब्दी, मिरजमधून महेश कांबळे (SC), मूर्तिजापूरमधून सम्राट सुरवाडे(SC), कारंजा मानोरामधून मोहम्मद युसूफ, नांदेड दक्षिणमधून सय्यद मोईन आणि कुर्लामधून बबिता कानडे(SC) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुस्लिम-दलितांच्या जोरावर निवडणूकअसदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने उमेदवार उभे केले, त्यावरुन त्यांचे राजकीय उद्दिष्ट समजू शकते. ओवेसी यांनी त्यांच्या 14 उमेदवारांपैकी 11 मुस्लिम आणि तीन दलित उमेदवार उभे केले आहेत. अशाप्रकारे ओवेसींचे लक्ष दलित आणि मुस्लिम व्होट बँकांवर आहे. महाराष्ट्रात 13 टक्के दलित आणि 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. अनेक राजकीय पक्षांनी या दोन समाजांच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच आता ओवेसींची नजर या मतांवर आहे.

महाराष्ट्रातील मुस्लिम राजकारणमहाराष्ट्रातील 12 टक्के मुस्लिम मतदार हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. महाराष्ट्रातील उत्तर कोकण, मराठवाडा, मुंबई पट्टा आणि पश्चिम विदर्भातील मुस्लिम मतदारांमध्ये राजकीय पक्षांचे भवितव्य घडविण्याची किंवा फोडण्याची ताकद आहे. अशाप्रकारे राज्यातील सुमारे 45 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार महत्त्वाचे आहेत, ज्यात मुंबईतील जागांचा समावेश आहे. गेल्या वेळी 10 मुस्लिम आमदारांनी निवडणुकीत विजय मिळवला होता, त्यात 3 काँग्रेस, 2 राष्ट्रवादी, 2 सपा, 2 AIMIM आणि 1 शिवसेनेचा आमदार आहे.

ओवेसींनी कमी उमेदवार का दिले?ओवेसी महाराष्ट्राच्या राजकारणात मुस्लिमांना पर्यायी नेतृत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते अनेकदा मुस्लिमांशी संबंधित मुद्दे संसदेत मांडताना दिसतात. 2014 पासून ओवेसी मुस्लिमांच्या जोरावर राज्यात निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2014 मध्ये AIMIM ने 24 जागांवर लढून दोन जागा जिंकल्या, तर 2019 मध्ये 44 जागांवर लढूनही फक्त दोन जागा जिंकण्यात यश आले. तसेच, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादसारखी जागा जिंकून ओवेसींनी सर्वांना चकित केले. यावेळी ओवेसींनी केवळ 14 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. 

असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम राजकारणावर काँग्रेस आणि सपा सारखे पक्ष नेहमी प्रश्न उपस्थित करतात. ओवेसींवर भाजपची बी-टीम असल्याची आरोपही अनेकदा करण्यात येतो. अनेक जागांवर निवडणूक लढवून ओवेसी भाजपला विजयी करण्याचे काम करतात, असा आरोप काँग्रेस आणि सपासारखे पक्ष करतात. यामुळेच, मुस्लिमांच्या मनात ओवेसींबद्दल संशय निर्माण झाला आहे. हाच संशय घालवण्यासाठी ठराविक जागांवर लक्ष केंद्रित करुन जास्तीत जास्त उमेदवार जिंकवण्याचा ओवेसींचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी