शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar Hospital Fire: विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांच्या समितीची नियुक्ती: हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 21:33 IST

Ahmednagar Hospital Fire: जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील आगीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला.

अहमदनगर  :  जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील आगीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील आठ अधिकाऱ्यांची समिती चौकशी करेल. या मध्ये कोणाचा हलगर्जीपणा आढळला किंवा कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. पालकमंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी केली व मृतांना मृतांप्रती शोक संवेदना व्यक्त केली. जखमींची विचारपूस केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,  विशेष पोलीस महानिरीक्षक पांडे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे आदी उपस्थित होते.

सकाळी साडेदहाच्या सुमारास सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची प्राथमिक शक्‍यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा असल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती आहे. ही समिती या घटनेची सखोल चौकशी करेल. अतिदक्षता विभागातील फायर ऑडिट झाले होते की नव्हते किंवा ऑडिट नंतर ज्या त्रुटी आढळल्या त्यात त्याची पूर्तता केली होती का नव्हती, हेही चौकशीमध्ये निष्पन्न होईल. ही घटना दिवसा घडली होती. त्यामुळे सीसीटीवी फुटेज मध्येही नेमकं कोण दोषी होतं हे आढळून येईल. सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केली आहे, असंही मुश्रीफ यांनी नमूद केलं.

पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी-  पांडेजिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेची पोलिसांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. विभागीय आयुक्तांची चौकशी समिती व पोलिसांची चौकशी समिती ही वेगवेगळी असेल. परंतु अहवाल तयार करताना किंवा कारवाई करण्याअगोदर या दोन्ही समित्यांनी त्यांच्या चौकशीतून निघालेला निष्कर्ष पाहिला जाईल, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक पांडे यांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणी सध्या अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश स्थानिक पोलिसांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHasan Mushrifहसन मुश्रीफ