शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

By admin | Updated: December 13, 2015 03:06 IST

शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते.

पुणे : शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील राहत्या घरी निधन झाले़ ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीचा प्रणेता गेल्याची भावना व्यक्त होत आहे़ जोशी यांच्या दोन्ही कन्या सध्या परदेशात असून, त्या सोमवारी परतणार आहेत़ त्यानंतर अंत्यसंस्कार कधी व कोठे होणार, हे जाहीर करण्यात येणार आहे़ निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बोपोडी येथील निवासस्थानी गर्दी केली होती. शेतकऱ्यांशी समरस होण्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेठाण येथे जमीन घेऊन शेती करण्यास सुरुवात केली़ शिकलेला आणि परदेशात राहिलेला पांढरपेशी माणूस काय शेती करणार आणि शेतीचे काय प्रश्न सोडविणार, असे सुरुवातीला त्यांच्याविषयी बोलले जात होते़ जोशी यांनी १९७९मध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी शेतकरी संघटना स्थापन केली़ ‘शेतमालास रास्त भाव’ हा एककलमी कार्यक्रम घेऊन त्यांनी चाकण येथे सर्वप्रथम कांदा उत्पादकांचे आंदोलन उभारले़ त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला़कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात, कापूस इत्यादी पिकांसाठी त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली़ त्यासाठी उपोषणे, मेळावे, तुरुंगवास, शिबिरे या मार्गांनी त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतल्या़ शेती आणि शेतकरी यांचा अभ्यास असणारे अनेक नेते त्यांनी घडविले़ शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे वर्णन करणारी ‘इंडिया विरुद्ध भारत’ ही संकल्पना क्रांतिकारी ठरली़ विकसित देशांत शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते, तर भारतात शेतकऱ्यांना उणे सबसिडी दिली जात असल्याचे त्यांनी दाखवून दिले़ संपूर्ण भारतातील विविध शेतकरी संघटनांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला़ शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर, शेतकरी महिला यांच्यासाठीही काम केले़ शेतमालावरील सर्व निर्बंध उठविण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती़ आपली ही भूमिका मांडण्यासाठी त्यांनी १९९४ मध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली़------------------------------------अल्पपरिचयशरद जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यात ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला़ प्राथमिक शिक्षण बेळगाव व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले़ बँकिंग विषयासाठीचे सी रँडी सुवर्णपदक त्यांनी पटकाविले़ कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याते म्हणून काम केले़ १९५८मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय टपाल सेवेत रूजू झाले़ १९५८ ते १९६८ या काळात टपाल खात्यात काम करीत असताना, त्यांचा पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीचे प्रवर्तक म्हणून सहभाग होता़ वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत (युनो) झेप घेतली़ तेथे काम करीत असताना त्यांनी जगातील आणि भारतीय शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत अभ्यास केला़ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले़ त्यातून त्यांनी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला व शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ते भारतात परत आले़ जुलै २००४ ते २०१० दरम्यान ते राज्यसभेचे खासदार होते़ खासदार म्हणून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठविला़ केंद्रात अनेक समित्यांवर भरीव काम केले़----------------------------------शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेचा जागतिक अभ्यासक आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा नेता आपण गमावला आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशेती, शेतकरी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. - एकनाथ खडसे, कृषीमंत्रीशरद जोशी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले. राज्यसभेत ते माझे सहकारी होते. काही विषयांवर आमचे वैचारिक मतभेदही होते, परंतु मला त्यांच्या त्यागाचा आणि प्रामाणिक निष्ठेचा नेहमीच आदर वाटत आला. शेतकऱ्यांमधील आत्मभान जागवून आपले प्रश्न ताठरपणे मांडायला त्यांनीच शिकविले. - खा. विजय दर्डा, ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमनशेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वाढते वयोमान व आजारपण आडवे आले नसते, तर कदाचित अखेरच्या श्वासापर्यंत शरद जोशी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरच लढताना दिसले असते. - खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष